महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग; नाशिकरोड रेल्वे स्थानकातील घटना - Godan Express Two Bogies Fire - GODAN EXPRESS TWO BOGIES FIRE

Godan Express Bogies Fire : मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना आग लागल्याची घटना नाशिक येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 5:43 PM IST

Updated : Mar 22, 2024, 9:13 PM IST

गोदान एक्स्प्रेसला आग

नाशिक Godan Express Bogies Fire :नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गोदान एक्स्प्रेसच्या दोन बोगींना भीषण आग लागली होती. शुक्रवारी (22 मार्च) दुपारी ही घटना घडली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय

नाशिकरोड रेल्वे स्थानकात घडला प्रकार : मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आलीय. ही ट्रेन मुंबईहून निघाली होती आणि नाशिकरोड स्थानकाजवळ पोहोचली होती. दरम्यान, गोदान (मुंबई एलटीटी-गोरखपूर) एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या सामानाच्या बोगीमध्ये अचानक आग लागली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश :आगीची माहिती मिळताच खबरदारी म्हणून ट्रेनचे बाकीचे सामान डब्यापासून वेगळे करण्यात आले. ही संपूर्ण घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडल्याचे सांगण्यात येतंय. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

सर्व प्रवासी सुरक्षित : गोदान एक्सप्रेस मुंबई ते गोरखपूर दरम्यान धावते. होळीमुळं या दिवसात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. दरम्यान, आगीचं वृत्त समजताच नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं सांगण्यात येतंय. प्रवाशांच्या बोगीला आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून रेल्वे कर्मचारीही मदतकार्यात सहभागी झाले होते.

मोठा अनर्थ टळला : गोदान एक्स्प्रेस ही नाशिकरोड रेल्वे स्थानकातून निघाली होती. त्यानंतर काही वेळातच ही भीषण आग लागल्याचं समजलं. त्यामुळं लगेच गाडी थांबवून या आगीवर नियंत्रण मिळवण्याच काम सुरू केलं होतं. रेल्वे जर वेगात असती तर मोठा अनर्थ घडला असता.

हेही वाचा -

  1. होळीच्या सणाला रेल्वेची खास सेवा: मध्य रेल्वे चालवणार 112 विशेष ट्रेन
  2. कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार
Last Updated : Mar 22, 2024, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details