महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात गुन्हा; अधिकाऱ्यानं दिलं स्पष्टीकरण - Molestation Case Addl Commissioner - MOLESTATION CASE ADDL COMMISSIONER

Molestation Case Additional Commissioner : लिपिक महिलेकडं शारीरिक सुखाची मागणी करणाऱया एका अतिरिक्त आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, हे सर्व आरोप या अधिकाऱ्यानं फेटाळून लावले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर बातमी...

Molestation Case Additional Commissioner
अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 10:21 PM IST

Updated : Aug 28, 2024, 10:46 PM IST

ठाणे Molestation Case Additional Commissioner :४२ वर्षीय विधवा महिला लिपिकाकडं शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात विनयभंगाचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. मात्र, माझ्याविरोधात कट रचला असून, हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्तांनी या सर्व प्रकरणानंतर दिलंय. तसंच त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळं पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. जमीर अकबर लेंगरेकर (वय ४६, रा. पनवेल) असं गुन्हा दाखल झालेल्या अतिरिक्त आयुक्तांचं नाव आहे.

अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर (Source - ETV Bharat Reporter)

शारीरिक सुखाची मागणी :४२ वर्षीय पीडित विधवा महिलेचे पती उल्हासनगर महापालिकेत चालक पदावर कार्यरत असताना त्यांचं २०१० साली आजारपणामुळं निधन झालं. त्यानंतर पतीच्या जागेवर २०११ साली पीडित महिला कनिष्ठ लिपिक म्हणून महापालिकेत रुजू झाली होती. त्यातच २०२२ साली मालमत्ता विभागात कार्यरत असताना या विभागाचा कार्यभार लेंगरेकर यांच्याकडं असल्यानं त्यांच्या दालनात कामानिमित्तानं महिलेचं जाणं येणं होतं. याचाच फायदा घेऊन संबंधित अधिकारी हे पीडित विधवेशी अश्लील चाळे करत वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होते, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना दिली.

महिला आयोगाकडंही केली तक्रार : एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ पर्यत असे प्रकार घडत होते. अखेर २० मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव घेत जमीर अकबर लेंगरेकर यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला. या तक्रारीनंतर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार १४ ऑगस्ट २०२३ रोजी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनानं विशाखा समिती स्थापन करून या तक्रारीची चौकशी सुरू केली होती. या चौकशीतील अहवाल महापालिका आयुक्तांकडं ५ सप्टेंबर २०२३ रोजी सादर केला, अशी माहिती पीडित विधवा लिपिकेनं दिली.

त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप : अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडं सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार असल्यानं त्यांनी जाणीवपूर्वीक मागील सहा महिन्यापासून मानसिक त्रास देत असल्याचं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पीडितेनं नमूद केलं. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त जमीर अकबर लेंगरेकर हे देत असलेल्या त्रासाला व शारीरिक सुखाच्या मागणीविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी धाव घेत त्यांच्याविरोधात कलम ३५४, ३५४ (ए) ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पीडित लिपिक विधवा महिलेनं दिली.

अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल :"पीडित महिला ही महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत असून, त्यांच्या तक्रारीवरून अतिरिक्त आयुक्त जमीर अकबर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पथक अधिक तपास करत आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औवताडे यांनी दिली.

अधिकाऱ्यानं फेटाळले आरोप : "पालिका हद्दीतील होर्डिंग घोटाळा बाहेर काढला असून, बेकायदा होर्डिंग ठेकेदारांवर उल्हासनगरमधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच हा घोटाळा बाहेर येवू नये म्हणून माझ्यावर आधी दबाव आणला होता. विशेष म्हणजे, पोलिसांकडून होर्डिंग घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच, माझ्याविरोधात कट रचून त्या लिपिक महिलेशी होर्डिंग ठेकेदारानं संगनमत करून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्या लिपिक महिलेने माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत," असं स्पष्टीकरण देत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा

  1. "लग्न केलं नाहीस तर घरच्यांना सोडणार नाही"; तरुणाच्या जाचाला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, दहा जणांवर गुन्हा दाखल - Minor Girl Suicide Nashik
  2. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या : पैसे उकळल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल - FIR Against EX DGP Sanjay Pande
  3. "मुलींवर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना शिकवण देण्याची गरज", मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलं - Badlapur Case in High Court
Last Updated : Aug 28, 2024, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details