महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ७२ वर्षीय बेकरी चालकाचा लैंगिक अत्याचार - Minor Girl Sexually Assault - MINOR GIRL SEXUALLY ASSAULT

Minor Girl Sexually Assault : चॉकलेटचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर ७२ वर्षीय बेकरी चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागातील एका बेकरीच्या दुकानात घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Minor Girl Sexually Assault
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:44 PM IST

ठाणे Minor Girl Sexually Assault : चॉकलेटचं आमिष दाखवून साडे नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ७२ वर्षीय वयोवृद्ध बेकरी चालकाने बेकरीतच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील एका बेकरीच्या दुकानात घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अत्याचारी वयोवृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. कमर अंसारी (वय ७२) असं अटक वयोवृद्ध आरोपीचं नाव आहे.

असा रचला प्लान :पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पश्चिम भागातील एका वस्तीत कुटुंबासह राहत आहे. तर ७२ वर्षीय आरोपीचं पीडित मुलगी राहत असलेल्या भागात बेकरीचं दुकान आहे. याच बेकरी मधून पीडित अल्पवयीन मुलगी ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास दूध आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानाच्या आता बोलावले. त्यानंतर दुकानाच्या आतमध्ये येताच तिला १० रुपये देऊन तिच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केला.

आरोपीने अल्पवयीन मुलीस तिला तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी 72 वर्षीय आरोपीस बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. --- शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी :पीडित मुलीवर अत्याचार होत असताना आरडाओरड केल्यास किंवा कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना ठार मारेल, अशी धमकीही पीडित मुलीला दिल्याचं पीडित मुलीच्या ४२ वर्षीय आईने दिलेल्या पोलीस ठाण्यातील तक्रारीत नमूद केलं आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून १ मे रोजी महात्मा फुले पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७६ (अ, ब), ५०६ सह पोक्सो कलम ४, ६ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. (४ मे) रोजी पर्यंतची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. किराणा दुकानातून अमली पदार्थांची विक्री; दोन विक्रेत्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, साडेचार कोटींचं ड्रग जप्त - Mephedrone MD drug seized in Thane
  2. अफगाणिस्तानच्या भारतातील वाणिज्यदूत अधिकाऱ्याचा कारनामा; अखेर दिला राजीनामा - Afghanistan Consul General Resigns
  3. मसुरी अपघात : कार दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू, देहराडूनच्या महाविद्यालयात शिकत होते तरुण - Road Accident In Mussoorie

ABOUT THE AUTHOR

...view details