'व्हॅलेंटाईन्स डे' ला केला शुभविवाह ठाणे Register Marriage on Valentine Day : 'व्हॅलेंटाईन्स डे’ हा प्रेमी जोडप्यांसाठी आणि तरुण मंडळींसाठी अत्यंत खास दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू दिल्या जातात. तसंच हा दिवस जोडप्यांसाठी विशेष असल्यानं प्रेमाच्या नात्याची आठवण म्हणून लग्नगाठ बांधली जाते. 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन्स डे' दिवशी ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात तब्बल 54 जोडप्यांनी रजिस्टर मॅरेज करून सुखी संसाराला सुरुवात केलीय.
'व्हॅलेंटाईन्स डे' ला शुभविवाह :14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' चा मुहूर्त साधून ठाण्यातील विवाह उपनिबंधक कार्यालयात, नववधू वरासह दोन घटस्फोटीत जोडपी आणि दोन फॉरेनर वरांसोबत दोघीजणी असे 54 जण बुधवारी लग्नाच्या बेडीत अडकले. प्रेमी-प्रेमिकांच्या उत्साहाचा दिवस असलेल्या व्हॅलेंटाईन्स डे चं स्तोम पाहायला मिळतं. प्रेमी जोडप्यांसाठी आपल्या प्रेमाचे अंतिम ध्येय म्हणजे शुभविवाह 'व्हॅलेंटाईन्स डे' ला व्हावं असं वाटत असतं. अनेक प्रेमी जोडपी या दिवसाचा मुहुर्त साधण्यासाठी प्रतिक्षा करत असतात.
५४ जण अडकले 'लग्नाच्या बेडीत' : ठाणे पश्चिमेकडील तलावपाळी परिसरात विवाह नोंदणीसाठी दुय्यम सहनिबंधकांचं कार्यालय आहे. जिल्ह्याभरातून येथे विवाहेच्छुक विवाह नोंदणीसाठी येतात. 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' चा मुहुर्त साधत बुधवारी नववधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींची झुंबड उडाली होती. या दिवशी तब्बल 54 जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. यात 58 ते 60 वयोगटातील दोन घटस्फोटीत जोडपी देखील होती. तर दोघी ठाणेकरांनी चक्क फॉरेनचा नवरा पटवून 'व्हॅलेंटाईन्स डे'ला शुभमंगल केलं. दरम्यान, गतवर्षी 'व्हॅलेंटाईन्स डे' ला 34 जणांनी विवाह केला होता, तर यंदा 54 जण लग्नाच्या बेडीत अडकल्याची माहिती विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिलीय.
हेही वाचा -
- आंतरजातीय-आंतरधर्मीय जोडप्यांसाठी' राज्यातील पहिलं 'सेफ हाऊस' सातारा जिल्ह्यात, 'असा' घेता येणार लाभ
- आंतरजातीय-आंतरधर्मीय जोडप्यांसाठी' राज्यातील पहिलं 'सेफ हाऊस' सातारा जिल्ह्यात, 'असा' घेता येणार लाभ
- सिंगल आहात? डोंट वरी... असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन्स डे'; जाणून घ्या टिप्स