ठाणे :ठाणे स्टेशन नजिक असलेल्या एका दागिन्यांचं दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 28.77 लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यातल अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेनं तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 21 डिसेंबर रोजी 5 जणांना अटक करण्यात आली असून एकूण 29 लाख 15 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना गुजरातमधुन अटक : ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारे सर्व आरोपी गुजरातमध्ये लपून बसले होते. लिलाराम उर्फ लिलेश मालाराम मेषवाल (वय- 29 वर्ष), चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती(वय- 35 वर्ष), जैसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी(वय- 32 वर्ष), दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया(वय- 24वर्ष), आरोपी नागजीराम प्रतापजी मेघवाल (वय- 29वर्ष) यांना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली माहिती (Source - ETV Bharat Reporter) पाचही आरोपी मूळचे राज्यस्थानमधील : अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडे पाच किलो वजनाची चांदीची नाणी, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल फोन आणि इतर वस्तु असा 29 लाख 15 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ठाणे न्यायालयात नेलं असता न्यायालयानं त्यांना 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मूळचे राज्यस्थान राज्यातील आहेत, तर या आरोपींवर कपोदय पो.स्टे सुरत, जसवंतपुरा पो.स्टे. राजस्थान येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा
- विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर
- वडाच नाही तर मुंबईकरांचं पोट भरणारा पावही महागला; महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री
- ...तर अभयसिंहराजे भोसले मुख्यमंत्री झाले असते, उदयनराजेंनंतर शिवेंद्रराजेंचाही शरद पवारांवर निशाणा