महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमडी ड्रग्ज विकून मिळवले 3 कोटी 46 लाख; आरोपीनं भिवंडीच्या घरात लपवली होती रक्कम, दहा आरोपींना अटक - Mumbai Crime News - MUMBAI CRIME NEWS

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) कक्ष 7 ने मोठी कारवाई केलीय. एमडी ड्रग्ज (MD Drugs) विकून मिळालेले 3 कोटी 46 लाखपेक्षा अधिक रक्कम पोलिसांनी जप्त करून, एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News
एमडी ड्रग्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 10:38 PM IST

मुंबई Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 7 ने कुर्ला पश्चिम येथील सयाजी पगारे चाळच्या बाजूच्या फुटपाथवर मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. तसेच या टोळीकडून अमली पदार्थ विकून मिळवलेली कोट्यवधींची माया जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय.

इतका अमली पदार्थ केला जप्त :याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) अमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8 क आणि 22 क, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींकडून 126 किलो अमली पदार्थ ज्याची किंमत 252 करोड 26 लाख इतकी आहे, हा जप्त करण्यात आला आहे. तसेच रोख तीन कोटी 62 लाख 56 हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याचप्रमाणे 25.07 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत एक लाख 50 हजार 420 इतकी आहे. एक दहा लाखांची स्कोडा मोटर कार देखील पोलिसांनी जप्त केलीय.

एमडी ड्रगसह केली अटक : कक्ष 7 च्या पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 16 फेब्रुवारीला सापळा रचून एका महिला आरोपीस कुर्ला पश्चिम चेंबूर सांताक्रुज लिंक रोडवर एकूण 641 ग्राम वजनाच्या एमडी ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. या महिलेच्या चौकशीत तिने हा अमली पदार्थ मिरा रोड येथील तिच्या ओळखीचे इसमांकडून आणला असल्याचं सांगितलं. त्यावरून कक्ष 7 च्या पथकानं एका आरोपीला मिरा रोड येथून तीन किलो वजनाच्या एमडी ड्रगसह अटक केली. त्यानंतर या व्यक्तीच्या चौकशीत गुजरात राज्यातील सुरत येथे राहणाऱ्या दोन व्यक्तींचा छडा लागला. त्यानंतर या दोन व्यक्तींना देखील गुजरात मधून अटक करण्यात आली. या गुन्हाचा तपास करत असताना एमडी ड्रग्जचा कारखाना सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत इरळी येथे असल्याचं आढळून आलं. त्यानुसार इरळी येथे मुंबई पोलिसांनी कारवाई करत एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण 122.500 किलो वजनाचे एमडी ड्रग्स ज्याची किंमत 245 कोटी इतकी आहे तो जप्त केला आहे.


एकूण दहा आरोपींना अटक : या गुन्हातील मुख्य आरोपीकडं केलेल्या अधिक तपासामध्ये आरोपीनं अमली पदार्थ विक्रीतून कमावलेले तीन कोटी 46 लाख 68 हजार दोनशे रुपये भिवंडी येथील घरात लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं, त्यानुसार पोलिसांनी 29 मार्चला ही कोट्यावधींची रक्कम जप्त केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे (वय 34) याच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील घरात ही कोट्यावधींची रक्कम सापडली असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परविन बानू गुलाब शेख वय 33, साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस (वय 25), इजाज अली अन्सारी (वय 24), आदिल इम्तियाज बोहरा (वय 22), प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे (वय 34), वासुदेव लक्ष्मण जाधव (वय 34), प्रसाद बाळसो मोहिते (वय 24), विकास महादेव मलमे (वय 25), अविनाश महादेव माळी (वय 28), लक्ष्मण बालू शिंदे (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -

  1. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर, दवाखाना चालवायला देणाऱ्या पत्नीलाही अटक - Mumbai Crime News
  2. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर, दवाखाना चालवायला देणाऱ्या पत्नीलाही अटक - Mumbai Crime News
  3. विदेशात नोकरीच्या शोधात असाल तर सावधान! 65 हजार वेतन देऊन गुन्हे करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Call Centre Fraud

ABOUT THE AUTHOR

...view details