नायगावsexualy assulted 7 year girl: बदलापूरमध्ये दोन 4 वर्षांच्या चिमुकलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगाव येथून लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. नायगावमधल्या एका नामांकित शाळेच्या कँटिनमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी दुसर्या इयत्तेत शिकते. कँटिंनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देत असल्याची तक्रार पीडित मुलीनं शिक्षिकेला केली. त्यानंतर शिक्षिकेनं मुख्याध्यापकांना या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत मुख्याध्यापिकेनं हे प्रकरण दडवून न ठेवता त्यांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या मुलीनं आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती, पण घरच्यांनी तिचं म्हणणं गांभिर्यानं घेतलं नाही.
15 दिवसांत चार ते पाच वेळा मुलीवर अत्याचार : धक्कादायक म्हणजे संबधीत आरोपीनं गेल्या 15 दिवसांत चार ते पाच वेळा मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तसंच या अगोदर इतर मुलींवर अत्याचार झाला का? याचा तपास देखील नायगाव पोलीस करत आहे. या शाळेत तिवारी नावाचा व्यक्ती कॅंटीन चालवतो. आरोपी असलेला अल्पवयीन दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता.