मुंबई-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत 99 उमेदवारांमध्ये काही महिलांनाही संधी देण्यात आलीय. पक्षाच्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे. फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील. विशेष म्हणजे भाजपाच्या पहिल्याच यादीत 13 महिलांना संधी मिळालीय. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलीय. तसेच श्रीजया या भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. नवी मुंबईतील बेलापूरच्या आमदार मंदा विजय म्हात्रे यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिलीय. दहिसर मतदारसंघातून मनीषा अशोक चौधरी यांना उमेदवारी मिळालीय.
भाजपाच्या यादीत 13 महिलांचा समावेश | |
मतदारसंघ | महिला उमेदवार |
भोकर | श्रीयजा अशोक चव्हाण |
फुलंबरी | अनुराधाताई अतुल चव्हाण |
नाशिक पश्चिम | सीमाताई महेश हिरे |
कल्याण पूर्व | सुलभा गायकवाड |
बेलापूर | मंदा विजय म्हात्रे |
दहिसर | मनीषा अशोक चौधरी |
गोरेगाव | विद्या ठाकूर |
पर्वती | माधुरी सतीश मिसाळ |
शेवगाव | मोनिका राजीव राजळे |
श्रीगोंडा | प्रतिभा पाचपुते |
कैज | नमिता मुंदडा |
चिखली | श्वेता महाले |
जिंतूर | मेघना बोर्डिकर |
बावनकुळे यांना कामठीतून तिकीट :यंदा भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उमेदवारी दिलीय. चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पार्टीनं कामठीतून तिकीट दिलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने बावनकुळे यांना तिकीट दिले नसले तरी यावेळी पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय.
कोळंबकर नवव्यांदा निवडणूक लढवतायत :तसेच वडाळा विधानसभेतून कालिदास कोळंबकर यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. कोळंबकर सलग नवव्यांदा निवडणूक लढवत असून, गेल्या आठ निवडणुकांत त्यांनी विजय मिळवलाय.