महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासूनं सुनेची केली हत्या; चिमुकली नात ठरली आजीचा काळ, हत्या करणाऱ्या सासूला न्यायालयानं ठोठावली जन्मठेप - MOTHER IN LAW KILLED WOMAN

सासूनं घरी आलेल्या सुनेचा खून केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. नातीनं दिलेल्या जबाबातून सासूनंच सुनेवर रॉकेल टाकून जाळल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ही शिक्षा ठोठावण्यात आली.

Mother In Law Killed Woman
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 11 hours ago

ठाणे : आपल्या मुलीच्या शाळेचे कागदपत्र घेण्यासाठी सासरी गेल्या सुनेची हत्या करत सून पेटल्याचा बनाव करणाऱ्या सासूचा तिची नातच काळ ठरली आहे. न्यायालयात सरकारी वकिलांनी तपासलेल्या साक्षीदारांमध्ये लहान नातीची साक्ष महत्वाची ठरली. नातीच्या साक्षीवरुन ही हत्या करणारी आजी जमनाबेन मंगे (76) हीच असल्याचं सिद्ध झालं. पुराव्यावरुन ठाणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस देशमुख यांनी सासू जमनाबेन मंगे हिला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजाराचा दंड ठोठावला. गुन्ह्यातील मृतकाचा पती अशोक मंगे (40) याची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली.

नातीची साक्ष ठरली महत्वाची :ठाणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस देशमुख यांनी दोषी ठरवलेली सासू जमनाबेन मंगे (76) ही रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे या परिसरात राहते. आरोपी जमनाबेन मंगेचा मुलगा अशोक मंगे याचा विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून मृतक सुनेचा एक अपत्य झाल्यानंतरही शुल्लक कारणावरून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. दरम्यान भांडणं झाल्याने पती अशोक आणि सासू जमनाबाई यांनी सुनेला घराबाहेर काढलं. सून माहेरी येऊन राहू लागली. दरम्यान मुलीच्या शाळेसाठी कागदपत्रं आणण्यासाठी सून घटनेच्या दिवशी 14 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास गेली सासरी गेली.

रॉकेल टाकून सुनेला दिलं पेटवून :भांडणं करून गेलेली सून घरी आल्याची संधी साधत सासू जमनाबेन (76) हिनं सुनेचा हात पकडून तिला स्वयंपाक घरात आणलं. यावेळी जाळून सुनेची हत्या करुन तिला जखमी अवस्थेत सुनेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिचा मृत्यू पूर्व जबाब नोंदवला. तसेच हा सगळा प्रकार 10 वर्षाच्या मुलीनं पहिला होता. तरीही सासूनं वागळे इस्टेट पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरण हे 10 वर्षाच्या मुलीसमोर घडलं. वागळे इस्टेट पोलिसांनी सासू जमनाबेन आणि तिचा मुलगा अशोक यांच्या विरोधात हुंडाबळी अंतर्गत गुन्हा नोंदवला. सदरचं प्रकरण ठाणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस देशमुख यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु होती. या खटल्यात सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी युक्तिवाद करुन न्यायालयात 7 साक्षीदार तपासले. तर खटल्यात प्रत्यक्षदर्शी असलेल्या दहा वर्षाच्या मुलीनं न्यायालयात साक्ष नोंदवली. तीच सासू जमनाबेन यांचा काळ ठरली.

मुलीच्या जबाबानंतर वडिलांची सुटका :सुनेला पेटवून हत्या केल्या प्रकरणी जमानबेन मंगे (76) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजाराचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार असल्याचं निकालात नमूद केलं. तर मृत सुनेचा पती अशोक मंगे याची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. ओडिसाच्या महिलेचा गोणीत आढळला मृतदेह; पती फरार झाल्यानं चर्चेला उधाण - Odisha Woman Killed In Mumbai
  2. पुण्यात प्रियकरानं केली सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या; 'Oyo' मध्ये झाला गेम
  3. Pune Crime: प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा नवऱ्याकडून खून; स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details