किंगस्टन WI vs BAN 2nd Test Live Streaming : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना जमैकाच्या किंगस्टन येथील सबिना पार्क इथं खेळवला जाणार आहे.
पहिल्या कसोटीत काय झालं : पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा 201 धावांनी पराभव केला. यासह यजमान वेस्ट इंडिजनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका काबीज करण्याच्या इराद्यानं वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याकडे लक्ष देईल. मात्र, पाहुण्या संघासाठी ते तितकं सोपं नसेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
खेळपट्टी कशी असेल : सबिना पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. पण नवीन चेंडू सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, जसजसा खेळ पुढं जाईल तसतसे फिरकीपटूंनाही खेळपट्टीवरुन काही आधार मिळेल, जो खेळात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. पहिल्या डावाची सरासरी 317 धावा आहे. या मैदानावर फलंदाज मोठे डाव खेळू शकतात हे यावरुन दिसून येते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि बोर्डवर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करु शकतो. मात्र, चांगल्या फलंदाजीमुळं पाठलाग करणं हाही चांगला निर्णय असेल.
सबिना पार्क येथील कसोटी सामन्यांची आकडेवारी कशी :मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबिना पार्कवर आतापर्यंत एकूण 55 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 18 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघाचे हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघांनी आतापर्यंत एकूण 21 वेळा कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं 21 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशनं केवळ 4 सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजनं 21 पैकी 8 सामने मायदेशात आणि 7 सामने घराबाहेर जिंकले आहेत. तर बांगलादेशनं मायदेशात दोन सामने आणि घराबाहेर दोन सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रॅथवेटनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. क्रेग ब्रॅथवेटनं बांगलादेशविरुद्ध 13 सामन्यांच्या 25 डावांमध्ये 43.21 च्या सरासरीनं 994 धावा केल्या आहेत. या कालावधीत क्रेग ब्रॅथवेटनं 3 शतके आणि 5 अर्धशतकं झळकावली असून 212 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :