क्राइस्टचर्च Fastest Fifty on Test Debut : इंग्लंड क्रिकेट संघाचा युवा फलंदाज जेकब बेथेलनं कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत विश्वविक्रम केला आहे. अवघ्या 37 चेंडूत अर्धशतक झळकावून त्यानं पदार्पणाच्या सामन्यातच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
🏴 ENGLAND WIN! 🏴
— England Cricket (@englandcricket) December 1, 2024
Brydon Carse takes 10 in the match and Harry Brook hits 171 in a brilliant victory in Christchurch 👊 pic.twitter.com/Zil5SWyW7Z
कसोटी पदार्पणातील सर्वात जलद अर्धशतक : बेथेलप्रमाणेच, पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज म्हणजे ल्यूक रोंची, ज्यानं 2015 मध्ये हेडिंग्ले इथं 70 चेंडूत 88 धावा करुन कीवी संघाला मालिका बरोबरीत आणण्यास मदत केली. कसोटी पदार्पणात सर्वात वेगवान अर्धशतक न्यूझीलंडच्या टीम साऊदीच्या नावावर आहे. त्यानं 2008 मध्ये नेपियर इथं इंग्लंडविरुद्ध केवळ 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक : कसोटी इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाबद्दल बोलायचं झाल्यास हा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज मिसबाह-उल-हकनं 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 चेंडूत झळकावलं होतं. बेन स्टोक्सनंही एजबॅस्टन इथं वेस्ट इंडिजविरुद्ध 24 चेंडूत ही कामगिरी केली.
🚨 JACOB BETHELL MADE HISTORY ON HIS TEST DEBUT 🚨
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 1, 2024
- Jacob Bethel has scored 2nd fastest fifty on Test Debut in the History. 🤯 pic.twitter.com/KLLl3Y6Wli
जेकब बेथेलची कारकीर्द कशी : बेथेलनं आतापर्यंत सात T20 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 57.66 च्या सरासरीनं 173 धावा केल्या आहेत. त्यानं सात वनडे सामन्यांत 27.83 च्या सरासरीनं 167 धावा केल्या आहेत. IPL मेगा लिलावात RCB नं इंग्लंडच्या जेकब बेथेलला ₹ 2.60 कोटींना विकत घेतलं. जेकब बेथेलचं पदार्पण अर्धशतक आणि ब्रायडन कारसेच्या शानदार गोलंदाजीमुळं इंग्लंडनं रविवारी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर न्यूझीलंडवर आठ गडी राखून शानदार विजय नोंदवला.
MAIDEN TEST FIFTY FOR JACOB BETHELL...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 1, 2024
- 50* (37) with 8 fours and a six to help England chase down 104 Vs New Zealand. Bethell has arrived. 🌟 pic.twitter.com/FmyQ3J3ZM6
दुसरी कसोटी 6 डिसेंबरला : इंग्लंडच्या आठ गडी राखून विजयानं किवीविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लॉर्ड्सवरील WTC फायनलसाठी पात्र नसले तरीही इंग्लंडनं त्यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) पॉइंट टक्केवारी 43.75 वर सुधारली. दरम्यान, न्यूझीलंडची गुणांची टक्केवारी 50 टक्क्यांपर्यंत घसरली आहे आणि त्यांच्या WTC अंतिम पात्रतेच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर रोजी वेलिंग्टन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेऊन गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ब्रायडेन कारसेला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आलं.
हेही वाचा :