महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पती मैदानावर खेळणार, पत्नी कॉमेंट्री करणार; बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनोखा क्षण - BORDER GAVASKAR TROPHY

बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळणार आहे.

Border Gavaskar Trophy
बॉर्डर-गावस्कर मालिका (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 22, 2024, 9:29 AM IST

पर्थ Border Gavaskar Trophy :बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळणार आहे. तर मैदानाबाहेर रवी शास्त्री, सुनील गावसकर, वसीम अक्रम, मार्क वॉ, ॲडम गिलख्रिस्ट यांसारखे दिग्गज कॉमेंट्री (समालोचन) करताना दिसतील. या महान व्यक्तींच्या यादीत एक नाव असं आहे, ज्यावर संपूर्ण जगाची नजर असेल. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला हे नाव प्रिय आहे. आम्ही बोलत आहोत रेचेल ख्वाजा हिच्याबद्दल, जी उस्मान ख्वाजाची पत्नी आहे. रेचेल ख्वाजा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्रीही करताना दिसणार आहे.

ख्वाजाची पत्नी करणार कॉमेंट्री :उस्मान ख्वाजाची पत्नी राहेल चॅनल 7 साठी कॉमेंट्री करताना दिसणार आहे. तर तिचा पती उस्मान मैदानावर भारतीय संघाचा सामना करताना दिसणार आहे. रेचलबद्दल बोलायचं तर ती टीव्ही हॉस्ट आहे आणि तिनं अनेक सामन्यांमध्ये कॉमेंट्री केली आहे. त्यामुळं या सामन्यात एक अनोखा क्षण पाहायला मिळणार आहे.

उस्मान ख्वाजावर असेल नजर : उस्मान ख्वाजासाठी भारताविरुद्धची ही कसोटी मालिका आगीच्या नदीपेक्षा कमी नाही. कारण भारतीय संघाविरुद्धचा त्याचा कसोटी रेकॉर्ड खराब आहे. या डावखुऱ्या फलंदाजानं भारताविरुद्धच्या 9 कसोटीत 34च्या सरासरीनं 544 धावा केल्या आहेत. मात्र ख्वाजासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्याची फलंदाजी ऑस्ट्रेलियात खूप लोकप्रिय आहे. उस्माननं ऑस्ट्रेलियात 52 पेक्षा जास्त सरासरीनं 2855 धावा केल्या आहेत ज्यात 9 शतकांचा समावेश आहे. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये उस्मान कशी कामगिरी करतो हे पाहायचं आहे.

भारताची प्रथम फलंदाजी :या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनमधील सर्वात मोठी बातमी म्हणजे अश्विन-जडेजा संघातून बाहेर आहेत.

सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11 : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

हेही वाचा :

  1. बुमराह-कमिन्स पर्थमध्ये नाणेफेकीला येताच घडणार इतिहास; 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'असं' फक्त पाचवेळा घडलं
  2. आजपासून अबूधाबीत सुरु होणार क्रिकेटचा 'नवा अवतार', वेगळ्या फॉरमॅटमध्ये होणार मॅचेस; रोमांचक सामने भारतात 'इथं' पाहा लाईव्ह
  3. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात कांगारुंना हरवणार? ऐतिहासिक सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details