महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, रोहित आणि द्रविडनं दिली ट्रॉफी - indian Cricket team welcome - INDIAN CRICKET TEAM WELCOME

Indian Cricket team welcome : भारतीय संघ टी-20 ट्रॉफी जिंकून भारतात परतला आहे. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचं अभिनंदन करताना दिसत आहे.

Indian Cricket team welcome
भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत (भारतीय टीमला भेटले पीएम मोदी (ANI PHOTO))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 4:53 PM IST

मुंबई - Indian Cricket team welcome : बार्बाडोसमधून टी-20 ट्रॉफी जिंकून परतलेला भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधानांनी भारतीय कोच राहुल द्रविडसह संपूर्ण संघातील खेळाडूंशी सुमारे दोन तास चर्चा केली. टीम इंडियाचा पंतप्रधानांशी झालेल्या भेटीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे संघातील प्रत्येक खेळाडूंशी संवाद साधत असून त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे. एका व्हिडिओत रोहित शर्मानं पीएम मोदींना ट्रॉफी दिली.

नरेंद्र मोदी केलं भारतीय संघाचं अभिनंदन : यानंतर संपूर्ण टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोटो काढले. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, भारतीय क्रिकेट संघ मुंबईला रवाना होण्यासाठी दिल्ली विमानतळाकडे रवाना झाला आहे, आज मरीन ड्राइव्ह येथे विजय परेड आणि वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होणार आहे. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह हे शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी बार्बाडोसमध्ये होते. भारतीय संघाला एक दशकाहून अधिक काळ प्रथम आयसीसी ट्रॉफी जिंकल्याबद्दल 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आज ते सादर करतील.

मुंबईत होणार भव्य जल्लोष : 29 जून 2024 च्या रात्री देश टी-20 ट्रॉफी जिंकल्यानं देशात दिवाळीसारखे वातावरण होते. यावेळी रोहित आणि विराट आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. या विजयाच्या जल्लोषात प्रत्येक भारतीय करत होता. आता भारतीय संघ ट्रॉफीसह मायदेशी परतला असताना दिल्ली ते मुंबईत त्यांच्या भव्य स्वागताची व्यवस्था करण्यात आली आहे. 'बेरील' चक्रीवादळाच्या आगमनामुळे भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये अडकून पडला होता. या वादळामुळे तेथील विमानतळावरची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी एअर इंडियाच्या विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था केली. हे विमान बुधवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.20 वाजता ब्रिजटाउनहून निघाले आणि गुरुवारी सकाळी 6.15 वाजता नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. या विमानात खेळाडू आणि कोचिंग स्टाफ, त्यांचे कुटुंबीय, बोर्डाचे काही अधिकारी आणि मीडियातील काही लोक देखील होते.

हेही वाचा :

  1. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या 4 मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा, आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी - MLA Pratap Sarnaik
  2. 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल; आज मुंबईत निघणार भव्य विजयी मिरवणूक, 'हे' रस्ते असणार बंद! - Team India Victory Rally
  3. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post

ABOUT THE AUTHOR

...view details