दांबुला SL vs WI 3rd T20I Live Streaming :श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
मालिका 1-1 नं बरोबरीत : दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेच्या संघानं वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजयी संघ निश्चित होईल. या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेचं नेतृत्व करत आहे. तर, वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्यात काय झालं : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 163 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 16.1 षटकांत केवळ 89 धावांवरच मर्यादित राहिला. श्रीलंकेसाठी ड्युनिथ वेलालागेनं 4 षटकांत 9 धावा देऊन 3 बळी घेतले आणि वेस्ट इंडिजसाठी रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 20 धावा केल्या. आता आज होणारा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 17 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंकेच्या संघानं नऊ सामने जिंकले आहेत. तर, वेस्ट इंडिजनं आठ सामने जिंकले आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. दोघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यामुळं या दोघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा T20 सामना 17 ऑक्टोबर (गुरुवार) रोजी संध्याकाळी 07:00 वाजता रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथं खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.