गॉल (श्रीलंका) Sri Lanka vs New Zealand 2nd Test Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंकेनं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. या सामन्यात किवी संघाला दुसऱ्या डावात 276 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 211 धावांवर गारद झाला. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. हा कसोटी सामनाही अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड : श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 39 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघानं 18 कसोटी सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 10 कसोटी जिंकल्या आहेत. याशिवाय 11 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. श्रीलंकेनं घरच्या मैदानावर खेळताना न्यूझीलंडला 8 कसोटी सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला आहे. तर पाच कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेत दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
लंकेचा संघ 2009 पासून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकू शकलेला नाही : आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 18 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात श्रीलंकेनं 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि न्यूझीलंड संघानं 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. श्रीलंकेचा संघ गेल्या 15 वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. शेवटच्या वेळी 2009 मध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 2-0 नं जिंकण्यात यश मिळविलं होतं.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (26 सप्टेंबर 2024) खेळवला जाणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळवला जाईल?