दांबुला (श्रीलंका) SL vs NZ 1st T20I Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
घरच्या मैदानावर श्रीलंकेची चमकदार कामगिरी : T20 विश्वचषकापासून श्रीलंका संघ घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेनं नुकतंच T20 आणि वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला तगडे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ भारताला कसोटी मालिकेत 3-0 नं पराभूत करुन या मालिकेत प्रवेश करेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं किवी संघासाठी इतकं सोपं नसेल. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका पाहायला मिळणार आहे.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 9 नोव्हेंबर, दांबुला
- दुसरा T20 सामना : 10 नोव्हेंबर, दांबुला
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि न्यूझीलंडचे संघ T20 मध्ये 23 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. यात न्यूझीलंडनं 13 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरुन किवी संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. मात्र, श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं इतकं सोपं नसेल.
खेळपट्टी कशी असेल :दांबुला येथील खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंना अनुकूल असते, कारण तिची खेळपट्टी कोरडी असते आणि कमी उसळीची असते. त्यामुळं धावा काढणं हे फलंदाजांसाठी थोडं आव्हानात्मक ठरु शकतं. याशिवाय वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये नव्या चेंडूनं स्विंगही मिळू शकतो. मात्र, हा रात्रीचा खेळ असल्यानं चेंडू अधिक चांगल्या प्रकारे बॅटवर येऊ शकतो. तसंच नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?