लाहोर 12 Member Squad for 1st ODI : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यास फारसे दिवस शिल्लक नाहीत, त्यामुळं बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघ वगळता त्यात सहभागी होणाऱ्या सर्व 8 संघांपैकी सर्व संघ त्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी वनडे मालिका खेळत आहेत. इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे, तर पाकिस्तान घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं त्यांचे संघ जाहीर केले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यात 6 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
गिराल्ड कोएत्झी संघात परतला :दक्षिण आफ्रिकेचा संघ तिरंगी मालिकेतील पहिला सामना 10 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी आफ्रिकेनं आपला 12 सदस्यीय संघ आज पाच दिवस आधीच जाहीर केला आहे, ज्यात वेगवान गोलंदाज गिराल्ड कोएत्झीचं पुनरागमन झालं आहे, तो बराच काळ फिट नसल्यानं खेळू शकला नव्हता. तसंच विशेष म्हणजे 6 अनकॅप्ड खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट असलेले महत्त्वाचे खेळाडू सध्या SA20 मध्ये खेळत आहेत आणि ते तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतरच आफ्रिकन संघात सामील होऊ शकतील. यात इथन बॉश, मिहलाली मपोंगवाना, गिडियन पीटर्स, मीका-एल प्रिन्स यांचा समावेश आहे. याशिवाय, कसोटी आणि T20I मध्ये पदार्पण करणारा मॅथ्यू ब्रीट्झके आणि कसोटीमध्ये पदार्पण करणारा सेनुरन मुथुसामी यांची नावं समाविष्ट आहेत.
तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), इथन बॉश, मॅथ्यू ब्रीट्झके, गेराल्ड कोएत्झी, ज्युनियर डाला, विआन मुल्डर, मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गिडियन पीटर्स, मिका-एल प्रिन्स, जेसन स्मिथ, काइल व्हेरेन.