महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

संजू सॅमसनचा तडाखा, आजपर्यंत कोणालाही न करता आलेला विक्रम केला, T20 मध्ये रचला इतिहास - SANJU SAMSON T20 CENTURIES

Sanju Samson Record: आजवर कोणताही फलंदाज करू शकलेला नाही, असा विक्रम संजू सॅमसननं केलाय. सॅमसनच्या वादळानं T20 मध्ये इतिहास रचलाय.

Sanju Samson, Tilak Verma
संजू सॅमसन, तिलक वर्मा (Etv Bharat National Desk)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 16, 2024, 4:13 PM IST

हैदराबाद Sanju Samson Record :भारताचा सलामीवीर संजू सॅमसननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20मध्ये शानदार शतक झळकावून इतिहास रचला. गेल्या दोन डावांत फ्लॉप ठरलेल्या या फलंदाजाचं हे तिसरं टी-20 शतक आहे. अशी कामगिरी करणारा संजू सॅमसन जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

56 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी :भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर संजू सॅमसननं शुक्रवारी (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथील न्यू वांडरर्समध्ये शानदार फलंदाजी करत विक्रम केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या T20 सामन्यात त्यानं इतिहास रचला. त्यानं 56 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी खेळून कारकिर्दीतील तिसरं टी-20 शतक झळकावलं. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात तीन शतकं झळकावणारा संजू सॅमसन जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

या मालिकेतील दुसरं शतक झळकवलं : सॅमसननं पाच डावांमध्ये तिसरं आणि या मालिकेतील दुसरं शतक झळकावलं. विशेष म्हणजे मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात, संजू सॅमसननंतर सलग दोन T20 शतके करणारा तिलक वर्मा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

संजू सॅमसननं रचला इतिहास :सतत संघात आणि संघाबाहेर असलेल्या संजू सॅमसननं दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. एका वर्षात तीन टी-20 शतकं झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बनण्याचा मान त्याला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी 30 वर्षीय सॅमसननं ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकावलं होतं. डरबनमध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यातही त्यानं शतक झळकावलं होतं.

1 वर्षात दोन टी-20 शतके झळकावणारे फलंदाज : कॉलिन मुनरो, फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या अनेक खेळाडूंनी एका वर्षात दोन टी-20 शतकं झळकावलीय, परंतु आतापर्यंत कोणालाही तीन शतकं ठोकता आलेली नाहीत. फिल सॉल्टनंतर, गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी करणारा सॅमसन टी-20 मालिकेत दोन शतके करणारा दुसरा खेळाडू ठरला. काही मिनिटांनंतर टिळक वर्माही या यादीत सामील झाला.

हे वाचलंत का :

  1. W,W,W,W,W... युवा गोलंदाजाचा महापराक्रम, एकाच डावात घेतल्या 10 विकेट
  2. 727/2... गोव्याच्या फलंदाजांनी उभारला धावांचा हिमालय; भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं
  3. साहेबांविरुद्ध 'करो या मरो' सामना करेबियन संघ जिंकणार? निर्णायक T20 मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details