सिडनी Rohit Sharma Opt Out :रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार? मेलबर्नमध्ये रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपली आहे का? रोहित शर्माला संघाबाहेर ठेवून त्याला निरोप दिला जाणार का? सिडनी कसोटी सुरु होण्यापूर्वी असे प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात नक्कीच असतील. सिडनी कसोटीपूर्वीच रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं प्रश्न उपस्थित होणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून असं वाटतंय की रोहित शर्मा आता भारतीय संघाचा कर्णधार नाही.
28 सेकंदाचा व्हिडिओ, रोहितनं गमावलं कर्णधारपद? :सिडनी क्रिकेट ग्राउंडवरुन आलेल्या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू सराव करत आहेत आणि त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर युवा फलंदाज शुभमन गिलशी बोलतो आणि त्याच्या पाठीवर थाप मारतो. यानंतर जसप्रीत बुमराहनं या खेळाडूशी हस्तांदोलन केलं. या संपूर्ण दृश्यात रोहित शर्मा कुठंच दिसत नाही. आता संघाचा कर्णधार बदलला असून जसप्रीत बुमराहच्या हाती कमान आली असून त्याचा उपकर्णधार शुभमन गिल असेल असं मानलं जात आहे.
रोहित शर्माला सिडनीत खेळणं का अवघड : रोहित शर्माला सिडनीत खेळणं कठीण झालं असून याचे अनेक संकेत मिळत आहेत. या व्हिडिओशिवाय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनंही असाच एक ट्रेलर रिलीज केला आहे. सर्वप्रथम रोहित शर्मा सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेला आला नव्हता. यानंतर गौतम गंभीरनं प्लेइंग इलेव्हनही उघड केली नाही. त्यानं रोहित शर्माच्या नावाची पुष्टीही केली नाही. खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घेणार असल्याचं गौतम गंभीरनं सांगितलं.
रोहित स्वत: बाहेर राहणार : इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्माला वगळण्याचा निर्णय स्वतःचा आहे. त्याचा खराब फॉर्म पाहता रोहित शर्मानं सिडनीमध्ये खेळणार नसल्याचं संघ व्यवस्थापनाला सांगितलं आहे. रोहितनं मुख्य निवड अधिकारी अजित आगरकर यांनाही याबाबत माहिती दिली आहे, जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा असेल तर गंभीर आणि आगरकर दोघंही याला सहमत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा :
- मनू भाकरसह चार खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा; वाचा यादी
- कुठून येतो इतका कॉन्फिडन्स? निर्णायक सामन्याच्या 24 तासाआधीच प्लेइंग 11 जाहीर; 469वा खेळाडू करणार 'डेब्यू'