पुणे Rishabh Pant fir for Pune Test : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. पुण्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. बंगळुरु इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पंतला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ध्रुव जुरेलनं कीपिंगची जबाबदारी घेतली होती. अशा स्थितीत पंत पुणे कसोटीत खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतला दुखापतीतून आराम : मात्र इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ऋषभ पंत बरा झाला आहे. त्याला गुडघेदुखीपासून आराम मिळाला आहे. बंगळुरु इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतला गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. यानंतर ध्रुव जुरेलनं त्याच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली. दुखापत झाल्यानंतर पंतनं हार मानली नाही तरीही तो फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानं 99 धावांची खेळीही खेळली. मात्र, फलंदाजी करताना पंतला धावा करण्यात अडचणी येत होत्या.
केएल राहुल की सरफराज दोघांपैकी कोण खेळणार : दुसरीकडे शुभमन गिल देखील दुखापतीमुळं पहिला कसोटी सामना खेळू शकला नसला तरी पुण्याच्या सामन्यात तो उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहितनं गिलला प्लेइंग-11 मध्ये निवडलं तर कोणाला वगळलं जाइल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. केएल राहुलच्या जागी गिलला संधी दिली जाऊ शकते याची शक्यता जास्त आहे. कारण केएल राहुलला बेंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात खातंही उघडता आलं नाही. तर दुसऱ्या डावात केवळ 12 धावा केल्या. दुसरीकडे सर्फराज खान आहे, जो पहिल्या डावात खातंही उघडू शकला नाही. पण पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं भारतीय संघाची धुरा सांभाळली. सर्फराजनं 150 धावांची दमदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं.