मेलबर्न MCG Boxing Day Test :भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 311 धावा केल्या. दरम्यान, या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एका विशेष विक्रमाची नोंद झाली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. या सामन्यात नवा इतिहास रचला गेला आहे.
मेलबर्न कसोटीत मोठा पराक्रम : दोन्ही संघांमध्ये बॉक्सिंग-डे कसोटी खेळली जात आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूप खास आहे. हा सामना जिंकणारा संघ सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल. दुसरीकडे, ख्रिसमसमुळं ऑस्ट्रेलियात सुट्टीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळंच हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियमवर पोहोचले होते. या चाहत्यांनी हा कसोटी सामना आणखीनच रोमांचक केला.
चाहत्यांनी केला नवा विक्रम : बॉक्सिंग-डे च्या निमित्तानं तब्बल 87 हजार 242 चाहते सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. या चाहत्यांनी संपूर्ण सामन्यात प्रत्येक चार, षटकार आणि विकेटवर आपल्या संघाला साथ दिली आणि एक विशेष विक्रमही केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी इतके चाहते यापूर्वी कधीही ऑस्ट्रेलियात आले नव्हते. 26 डिसेंबर 2024 रोजी या चाहत्यांनी एक नवा विक्रम केला. यावरुन दोन्ही देशांमध्ये या मालिकेची क्रेझ खूप जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ कसा : सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघानं 86 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. यात पहिलं सत्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर तर तिसरं सत्र भारताच्या नावावर होतं. सामन्याचं दुसरं सत्र दोन्ही संघांमध्ये सामायिक झालं. खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासनं 60 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय मारनेश लबुशाग्नेनं 72 धावा केल्या. सध्या ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ 68 आणि पॅट कमिन्स 8 धावांसह खेळत आहेत. जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं तीन विकेट घेतल्या.
हेही वाचा :
- Boxing Day Test: पहिल्या दिवशी कांगारुंच्या 4 फलंदाजांची 'फिफ्टी'; शेवटच्या सत्रात भारताचं पुनरागमन
- MCG वर 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासचं वादळ; 4483 चेंडू, 1445 दिवसांनी बुमराहनं पाहिला 'हा' क्षण