मुंबईRanji Trophy Final: रणजी ट्रॉफीत मुंबई संघ आणि विदर्भ संघ यांच्यात 10 मार्चपासून अंतिम सामना सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्यावानखेडे स्टेडियमवर (Wankhede Cricket Stadium) होणार आहे. मात्र, रणजी करंडक स्पर्धेतील फायनल सामन्यासाठी तिकिटांची विक्री होणार नाही. सर्व प्रेक्षकांना अंतिम सामन्याचा आनंद मोफत घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) बुधवारी सांगितलं की, मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy 2024) अंतिम सामन्याकरिता दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सर्वसामान्यांना मोफत प्रवेश दिला जाईल.
वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण : वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं दोन्ही संघाचे कर्णधार आणि सर्व सामना अधिकाऱ्यांना एक विशेष स्मृतीचिन्ह 10 मार्च रोजी खेळ सुरू होण्यापूर्वी प्रदान केलं जाणार असल्याचं एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक (Ajinkya naik) यांनी सांगितलं. मुंबईला पाठिंबा देण्यासाठी सर्व वयोगटातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला वानखेडे स्टेडियमवर येण्यास सांगितलं आहे. उपांत्य फेरीत मुंबई संघानं तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. तर विदर्भानं मध्य प्रदेश संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.