अबूधाबी 34 Runs in an Over : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावापूर्वी इंग्लंडच्या फिल सॉल्टनं अबूधाबी T10 लीग तुफान जिंकली. फिल सॉल्टनं अबूधाबी T10 लीगमध्ये अजमान बोल्ट्सविरुद्ध 18 चेंडूत स्फोटक अर्धशतक केलं. यासह त्यानं एकाच षटकात सर्व चेंडूंवर अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली. फिल सॉल्टनं अफगाणिस्तानच्या गुलबदिन नईबविरुद्ध षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार-चौकार ठोकलं.
कशी केली धुलाई : फिल सॉल्टनं पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारुन गुलबदिनविरुद्ध धमाका केला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्यानं चौकार मारला. ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूंवर चौकार मारल्यानंतर फिल सॉल्टनं शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार मारुन अजमान बोल्टच्या गोलंदाजांची अवस्था बिकट केली. कर्णधार फिल सॉल्टच्या झंझावाती फलंदाजीमुळं टीम अबुधाबीनं अजमान बोल्ट्सविरुद्ध एकतर्फी विजय संपादन केला.
टीम अबुधाबीचा एकतर्फा विजय : या सामन्यात अजमान बोल्ट्स संघाला नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होते. प्रथम फलंदाजी करताना अजमान बोल्ट्सनं 10 षटकांत 8 गडी गमावून 79 धावा केल्या. या कालावधीत, गोलंदाजीमध्ये, टीम अबुधाबीकडून कादीम ॲलन, झीशान नसीर आणि मार्क अदीर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय रुमन रईस आणि काइल मेयर्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम अबुधाबीची आक्रमक फलंदाजी : लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम अबुधाबीच्या वतीनं सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोनं अवघ्या 34 चेंडूत सामना संपवला. टीम अबुधाबीची एकमेव विकेट पॉल स्टर्लिंगच्या रुपानं पडली. यानंतर फिल सॉल्ट आणि बेअरस्टो या जोडीनं असा कहर केला की अजमान बोल्टचे गोलंदाज घाबरले. टीम अबुधाबीसाठी जॉनी बेअरस्टोनं 14 चेंडूत 22 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
हेही वाचा :
- पती मैदानावर खेळणार, पत्नी कॉमेंट्री करणार; बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनोखा क्षण
- नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा 10 पटीनं महागडं आहे पर्थचं ऑप्टस स्टेडियम, किती आहे किंमत?
- बुमराह-कमिन्स पर्थमध्ये नाणेफेकीला येताच घडणार इतिहास; 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'असं' फक्त पाचवेळा घडलं