महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पॅरालिम्पिकमध्ये नितेश कुमारचा 'सुवर्णस्मॅश'; भारताला मिळालं दुसरं 'गोल्ड मेडल' जिंकवून देत रचला इतिहास - Paris Paralympics 2024

Paris Paralympics 2024 : भारताचा स्टार शटलर नितेश कुमारनं सोमवारी इथं सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं.

Paris Paralympics 2024
भारताला मिळालं दुसरं 'गोल्डमेडल' (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 2, 2024, 5:08 PM IST

Updated : Sep 2, 2024, 5:26 PM IST

पॅरिस Paris Paralympics 2024 : भारताचा दिग्गज शटलर नितीश कुमारनं सोमवारी इथं सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. आज 2 सप्टेंबर (सोमवार) रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नितेशनं ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरानं नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं.

नितेशनं रचला इतिहास :अंतिम सामन्यात नितेश कुमारनं पहिला सेट सहज जिंकला. मात्र यानंतर ब्रिटीश खेळाडूनं शानदार पुनरागमन करत दुसरा सेट जिंकत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीचा सामना झाली. त्यात नितेशनं बाजी मारली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भारतीय बॅडमिंटनपटूनं पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अव्वल मानांकित भारतीय नितेशनं उपांत्य फेरीत जपानच्या डायसुके फुजिहारावर शानदार सरळ सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत फुजिहारावर 21-16, 21-12 असा विजय मिळवत आपलं वर्चस्व दाखवलं. 2009 मध्ये एका अपघातात त्याचा डावा पाय कायमचा निकामी झाला होता.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते :

  • अवनी लेखरा (नेमबाजी) : सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  • मोना अग्रवाल (नेमबाजी) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
  • मनीष नरवाल (नेमबाजी) : रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  • रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
  • निषाद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
  • योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) : रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
  • नितेश कुमार (बॅडमिंटन) : सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)

हेही वाचा :

  1. योगेश कथुनियाचा पॅरालिम्पिकमध्ये जलवा... डिस्कस थ्रोमध्ये जिंकलं रौप्यपदक - Paris Paralympics 2024
  2. रुबिना फ्रान्सिसनं लावला अचूक 'निशाणा'; पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालं पाचवं पदक - Paris Paralympics 2024
  3. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलच्या सन्मानासाठी गूगलचं खास 'डूडल' - Paris Paralympics 2024
Last Updated : Sep 2, 2024, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details