महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुस्तीपटू विनेश फोगटला अजूनही मिळू शकतं 'सिल्वर मेडल'? आज होणार मोठा निर्णय - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Vinesh Phogat still get silver medal : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटसह 140 कोटी देशवासीयांची पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीत रौप्यपदकाची आशा अजूनही संपलेली नाही. विनेशला अजूनही रौप्य पदक मिळू शकतं. (Vinesh Phogat Verdict)

Vinesh Phogat
विनेश फोगट (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 8, 2024, 12:59 PM IST

Updated : Aug 8, 2024, 3:17 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीमध्ये भारताला रौप्यपदक (Silver Medal) मिळण्याची अजूनही आशा आहे. कारण भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं 50 किलो गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतर 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट' (CAS) अपील केलं आहे. सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी सामना खेळणार असलेल्या फोगटला बुधवारी वजन मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आलं होतं. (vinesh phogat appeal result)

CAS चा निर्णय आज येणार : फोगटनं सीएएसला रौप्यपदक देण्याची विनंती केली आहे. त्याचा निर्णय आज, गुरुवारी येणं अपेक्षित आहे. 'विनेश फोगटनं तिच्या अपात्रतेविरुद्ध कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) मध्ये अपील केलं आहे आणि रौप्यपदकाची मागणी केली आहे. CAS आज आपला निर्णय जाहीर करणार आहे. CAS नं विनेशच्या बाजूनं निर्णय दिल्यास IOC ला विनेशला संयुक्त रौप्यपदक द्यावं लागेल. (Vinesh Phogat get Medal)

100 ग्रॅम जास्त होतं वजन : मंगळवारी रात्री खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत फोगटनं क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करुन अंतिम सामन्यात पात्र झाली. मात्र निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन असल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनशॉ परडीवाला यांनी खुलासा केला की, 'फोगटनं उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर 2.7 किलो वजनाची मर्यादा ओलांडली होती. तिचं अन्न आणि पाण्याचं सेवन मर्यादित करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सर्व प्रयत्न करुनही आम्ही अपयशी ठरलो.'

विनेश फोगटनं जाहीर केली निवृत्ती : पॅरिस ऑलिम्पिकमधील या निर्णयानंतर भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं आज सकाळी निवृत्ती जाहीर केली. तिच्या सोशल मीडियावर तिने आई प्रेमलता यांना उद्देशून विनेशनं लिहिलं, 'आई, कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ कर, तुझी स्वप्नं आणि माझं धैर्य, सर्व काही तुटलं आहे. आता माझ्यात ताकद उरली नाही. 2001-2024 कुस्तीला अलविदा. मी तुम्हा सर्वांची ऋणी राहीन. मला क्षमा करा'.

हेही वाचा :

  1. अलविदा कुस्ती! "मी हरले, कुस्ती जिंकली"; भावनिक पोस्ट शेयर करत विनेश फोगटनं कुस्तीला ठोकला 'रामराम' - Vinesh Phogat Goodbye To Wrestling
  2. विनेश फोगटचं 52 किलो होते वजन, रात्रभर प्रयत्न केले, केसंही कापले, पण...; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली 'इनसाईड स्टोरी' - Vinesh Phogat Disqualified
Last Updated : Aug 8, 2024, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details