पॅरिस 29 July India Olympic Schedule :पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा दुसरा दिवस भारतासाठी धमाकेदार ठरला आणि भारतीय महिला नेमबाज मनू भाकरनं कांस्यपदक जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलंच पदक होतं. आज आम्ही तुम्हाला भारताच्या तिसऱ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक सांगणार आहोत. तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि तिरंदाजीमध्ये देशासाठी चमकदार कामगिरी करताना दिसतील.
28 जुलै रोजी भारतीय खेळाडूंचे कोणते सामने :
बॅडमिंटन : भारतीय खेळाडू तिसऱ्या दिवसाची सुरुवात बॅडमिंटननं करताना दिसतील. पहिला सामना पुरुष दुहेरीचा असेल, जिथं सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जर्मनीच्या लॅम्सफस मार्क आणि सीडेल मार्विन यांच्यासोबत खेळताना दिसतील. क्रास्टो तनिषा आणि अश्विन पोनप्पा महिला दुहेरीत भारताकडून खेळताना दिसणार आहेत. तिचा सामना जपानच्या मात्सुयामा नामी आणि चिहारुसोबत खेळताना दिसणार आहे. बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन भारताकडून खेळताना दिसणार आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यात तो बेल्जियमच्या कारागी ज्युलियनसोबत खेळताना दिसणार आहे.
- पुरुष दुहेरी : (ग्रुप स्टेज) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, दुपारी 12 वाजता
- महिला दुहेरी (ग्रुप स्टेज) : क्रॅस्टो तनिषा आणि अश्विन पोनप्पा, दुपारी 12:50 वाजता
- बॅडमिंटन पुरुष एकेरी गट स्टेज सामना (लक्ष्य सेन), संध्याकाळी 6:30 वाजता
नेमबाजी : 29 जुलै हे भारतासाठी पूर्णपणे नेमबाजीनं व्यस्त असणार आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता स्पर्धेत भारतासाठी एकेरीत कांस्यपदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग टीम 1 मध्ये खेळताना दिसणार आहेत. तर रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा टीम 2 कडून खेळताना दिसणार आहेत. पुरुषांच्या ट्रॅप पात्रतेमध्ये भारतासाठी पृथ्वीराज तोंडाईमन दिसणार आहे. रमिता जिंदाल 10 मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत आणि अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल पुरुषांच्या अंतिम फेरीत दिसणार आहेत.
- 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग - सांघिक 1) (रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा - सांघिक 2), दुपारी 12:45 वाजता
- पुरुष ट्रॅप पात्रता (पृथ्वीराज तोंडाईमन), दुपारी 1 वाजता
- 10 मीटर एअर रायफल महिला अंतिम (रमिता जिंदाल), दुपारी 1 वाजता
- 10 मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी (अर्जुन बबुता), दुपारी 3:30 वाजता