पॅरिस 1 August India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा पाचवा दिवस भारतासाठी चांगला होता. भारतानं बुधवारी एकही पदक सामना खेळला नाही. परंतु, भारतीय शटलर्स पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापले सामने जिंकत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. याशिवाय टेबल टेनिसमध्येही श्रीजा अकुलानं चमकदार कामगिरी केली. आज आम्ही तुम्हाला सहाव्या दिवसाच्या पूर्ण वेळापत्रकाबद्दल सांगणार आहोत.
भारतीय खेळाडूंच्या 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धा :
गोल्फ : भारतीय खेळाडू 1 ऑगस्ट रोजी गोल्फमध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसतील. गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा पुरुषांच्या वैयक्तिक खेळाच्या फेरी-1 च्या सामन्यात दिसणार आहेत.
- पुरुषांच्या वैयक्तिक खेळाची फेरी-1 (गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा) - दुपारी 12:30 वाजता
नेमबाजी : आज नेमबाजीत भारताला पदक मिळण्याची आशा असेल. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत कोल्हापुरचा स्वप्नील कुसाळे भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. याशिवाय महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता स्पर्धेत सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मुदगिल खेळताना दिसतील.
- पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स फायनल (स्वप्नील कुसळे) - दुपारी 1 वाजता
- महिलांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पात्रता (सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मुदगिल) - दुपारी 3:30 वाजता