नवी दिल्ली Manu Bhaker Sarbajot singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज दुसरं पदक जिंकलं आहे. भारताची स्टार नेमबाज जोडी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकवून भारताचा तिरंगा फडकवला आहे. यानिमित्ताने देशातील अनेक लोक सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळं देशातील अनेक दिग्गजांनी त्यांचं अभिनंदन केलंय.
पीएम मोदींची प्रतिक्रिया : भारताच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांंचं अभिनंदन केलं आहे. पीएम मोदींनी सोशल मिडिया एक्सवर लिहिलं की, "आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं अभिनंदन. दोघांनी उत्तम कौशल्य दाखवंल. मनू भाकरचं हे सलग दुसरं ऑलिम्पिक पदक आहे."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा : सोशल मीडिया सोशल मिडिया एक्सवर लिहिलं की, "मनू भाकरनं इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारतातील पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तिचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. मी मनू भाकरला आणि सरबज्योत सिंगला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा."
सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानं केलं कौतुक :ऑलिम्पिकमधील भारताचा माजी सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानेही या दोघांचं पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यानं लिहिलं, "मनू आणि सरबजोत तुम्ही ते केलं ते यापूर्वी कोणत्याही भारतीय शूटिंग जोडीनं केलं नाही. हे भारताचं पहिलं ऑलिम्पिक नेमबाजी सांघिक पदक आहे."