अमेरिकेपेक्षा कमी पदकं जिंकूनही चीन ऑलिम्पिक पदकतालिकेत अव्वल स्थानी; 91 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक? - Olympics 2024 Medal Tally - OLYMPICS 2024 MEDAL TALLY
Paris Olympics 2024 medal tally : पॅरिस ऑलिम्पिक पदकतालिकेत चीननं अमेरिकेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याच वेळी, पाकिस्तानच्याही मागे राहात भारतानं 82 पैकी 71 व्या स्थानावर आपली मोहीम पूर्ण केली.
पॅरिस Paris Olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम केवळ 6 पदकांसह संपली. भारतीय संघ दोन अंकी पदक जिंकण्याच्या उद्देशानं पॅरिसला गेला होता. पण 6 खेळाडू चौथ्या क्रमांकावर राहिल्यानं आणि नंतर विनेश फोगटची अपात्रता यामुळं भारताची निराशा झाली. पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत अमेरिकेला मागं टाकत चीन अव्वल स्थानावर आहे.
पॅरिस ऑलिम्पिक पदकतालिका (IANS Photo)
चीननं अमेरिकेला टाकलं मागे :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पदकतालिकेत चीननं अमेरिकेला मागं टाकलं आणि रविवारी खेळांच्या अंतिम दिवशी 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावलं.
अमेरिका दुसऱ्या स्थानावर : अमेरिकेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 38 सुवर्ण, 42 रौप्य आणि 42 रौप्यपदकांसह एकूण 122 पदकं जिंकली. अमेरिकेच्या एकूण पदकांची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. मात्र 1 सुवर्णपदकानं पिछाडीवर असल्यामुळं पदकतालिकेत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि जपानचंही वर्चस्व : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियानं एकूण 50 पदकं जिंकली आहेत. कांगारुंनी 18 सुवर्ण, 18 रौप्य आणि 14 कांस्यपदक पटकावले असून ते पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी जपान 18 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्यांसह एकूण 43 पदकांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
फ्रान्सचाही टॉप 5 मध्ये समावेश : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे यजमान फ्रान्स 16 सुवर्ण, 24 रौप्य आणि 22 कांस्यपदकांसह 62 पदकांसह पदकतालिकेत टॉप-5 मध्ये आले आहेत. त्याच वेळी, 14 सुवर्ण, 22 रौप्य आणि 27 कांस्यांसह एकूण 63 पदकं जिंकल्यानंतर, ब्रिटन सहाव्या स्थानावर घसरला आहे आणि टॉप-5 मधून बाहेर पडला आहे.
भारत 71 व्या स्थानावर : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची कामगिरी चांगली नव्हती. 1 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 6 पदकांसह भारतानं पदकतालिकेत 71 व्या क्रमांकावर आपली मोहीम पूर्ण केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 206 देश सहभागी झाले होते. यापैकी एकूण 91 देशांनी काही ना काही पदकं जिंकली. या 91 देशांनी मेडल टेलीमध्ये 82 स्थान मिळवले. ज्यात भारत 71 व्या स्थानावर आहे. यावरुन भारताच्या खराब कामगिरीचा अंदाज लावता येतो. 1 सुवर्णपदकासह पाकिस्तान भारतापेक्षा वरच्या म्हमजेच 62 व्या स्थानावर आहे.