Paris Olympics 2024 Archery : भारतीय पुरुष तिरंदाजी संघाला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाचा सोमवारी झालेल्या सामन्यात तुर्की संघाकडून 6-2 असा पराभव झाला.
भारतीय पुरुष तिरंदाजी संघाची निराशाजनक कामगिरी : उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तरुणदीप राय, प्रवीण जाधव आणि बोम्मदेवरा धीरज या भारतीय त्रिकुट पहिल्या दोन सेटमध्ये 57-53 आणि 55-52 असे पिछाडीवर होते. मात्र, पहिले दोन सेट गमावल्यानंतर भारतीय संघानं तुर्कीविरुद्ध तिसरा सेट जिंकून पुनरागमन केलं. पण, भारताचा हे पुनरागमन सामना जिंकण्यासाठी पुरेसं नव्हतं. कारण चौथ्या सेटमध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. परिणामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरले.
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय तिरंदाजांची कामगिरी :
- धीरज बोम्मादेवरा : 7 10 8 9 10 9 9 7 : 69 गुण
- तरुणदीप राय : 9 8 8 8 9 10 9 9 : 70 गुण
- प्रवीण जाधव : 10 9 9 10 8 9 10 10 : 75 गुण
तुर्कीची सुरुवातीपासून पकड : तुर्की संघानं सामन्याच्या सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसरा सेटही तुर्कस्तानच्या बाजूनं जाईल असं वाटत होतं. पण, बर्कीम तुमरनं शेवटच्या शॉटमध्ये 7 धावा केल्या, ज्यामुळं भारतानं सेट जिंकला. अंतिम सेटमध्ये जाधवनं दोन 10 गुणांचे शॉट्स केले. परंतु, दोन वेळा विश्वचषक कांस्यपदक विजेत्या बोम्मादेवरानं संघाच्या अंतिम प्रयत्नात केवळ 7 गुण मिळवले. त्याच वेळी, सध्याच्या ऑलिम्पिक वैयक्तिक चॅम्पियन तुर्कीच्या मेटे गाझोजनं अचूक 10 गुण केले आणि चौथ्या सेटमध्ये आपल्या संघाला 58-54 असा विजय मिळवून दिला. तत्पुर्वी महिला सांघिक तिरंदाजी उपांत्यपूर्व फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा :
- अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या मिनिटाला गोल करत भारतीय पुरुष हॉकी संघाची अर्जेंटिनाशी बरोबरी - Paris Olympics 2024