पॅरिस Paris Olympics 2024 : ब्रिटनचा माजी अव्वल टेनिसपटू अँडी मरेनं पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यानं पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं. मरेनं गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेतून आपलं नाव मागं घेतलं. मात्र, तो टेनिस दुहेरीत सहभागी होणार आहे.
अँडी मरेची एकेरी स्पर्धेतून माघार : दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अँडी मरे डॅन इव्हान्ससोबत पुरुष दुहेरीत भागीदारी करेल आणि तिसरं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा प्रयत्न असेल. माघारी घेताना मरेनं एका निवेदनात म्हटलं, "डॅनसोबत दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी एकेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा सराव उत्कृष्ट झाला आहे आणि आम्ही एकत्र चांगलं खेळत आहोत. मी पुन्हा एकदा जीबी (ग्रेट ब्रिटन) चं प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे."
दोन वेळा जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक : ब्रिटीश खेळाडू मरेनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ग्रास कोर्टवर पहिलं सुवर्णपदक जिंकलं. तेव्हा अंतिम फेरीत त्यानं स्विस दिग्गज रॉजर फेडररचा तीन सेटमध्ये पराभव केला होता. त्यानंतर 2016 च्या रिओ ऑलिम्पिक अंतिम सामन्यात मरेनं अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोचा पराभव केला आणि दोन ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदकं जिंकणारा पहिलाच पुरुष टेनिसपटू बनण्याचा विक्रम केला होता.
3 वेळा पटकावलं ग्रँडस्लॅम : याशिवाय मरेनं 3 ग्रँडस्लॅमही पटकावले आहेत. मरेनं 2013 आणि 2016 मध्ये दोन वेळा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याच वेळी तो 2012 मध्ये अमेरिकन ओपनचा विजेता ठरला. तसंच मरेनं 5 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनलही गाठली, पण त्याला एकदाही विजेतेपद पटकावता आलं नाही.
हेही वाचा :
- भारतीयांसाठी अनोळखी असणाऱ्या गोल्फचा काय आहे इतिहास? मागील ऑलिम्पिकमध्ये पदकानं हुलकावणी दिलेल्या 'आदिती'ला यंदा पदक मिळेल? - Paris Olympics 2024
- भारतीय महिला तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत; कोरियानं मिळवले विक्रमी गुण - Paris Olympics 2024
- आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानींची फेरनिवड; आयओसीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला - Paris Olympics 2024