कराची PAK vs NZ 1st Match Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) चा पहिला सामना आज 19 फेब्रुवारी (बुधवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आठ संघांच्या या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीतील नव्यानं बांधलेल्या राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि बांगलादेशसह पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा गट अ मध्ये समावेश आहे. यापूर्वी, दोन्ही संघ तिरंगी मालिकेत एकमेकांसमोर आले होते, ज्यात पाकिस्ताननं अंतिम सामन्यासह न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही सामने गमावले होते. (PAK vs NZ 1st Match Live in india)
कीवी संघाला मोठा धक्का : या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि बेन सीअर्स दुखापतीमुळं बाहेर पडले आहेत आणि त्यांच्या जागी काइल जेमीसन आणि जेकब डफी यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी मिचेल सँटनर कीवी संघाचं नेतृत्व करेल. संघात अनुभव आणि तरुणाईचा चांगला समतोल आहे, ज्यात केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि विल्यम ओ'रोर्क असे प्रमुख खेळाडू आहेत.
कर्णधार म्हणून पहिलीच आयसीसी स्पर्धा : त्याचवेळी, यजमान पाकिस्तान जिंकण्याच्या इराद्यानं या सामन्यात प्रवेश करेल. पाकिस्तान संघाचं नेतृत्व यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान करणार आहे, जो पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून त्याची पहिली आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. त्याच्याशिवाय संघात बाबर आझम, फखर जमान, हरिस रौफ, नसीम शाह आणि सलमान आगा सारखे महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे सामन्याची दिशा बदलू शकतात.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : न्यूझीलंड आणि पाकिस्तान (PAK vs NZ 1st Match Live) यांच्यात आतापर्यंत 118 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघानं 53 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननं 61 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने निकालाविना राहिले आणि 1 सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांमधील सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे, ज्यात पाकिस्ताननं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण न्यूझीलंडला पहिला सामना जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. तसंच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहास 2000, 2006, 2009 साली हे संघ आमनेसामने आले आहेत, यातील तीन्ही वेळा न्यूझीलंडनं विजय मिळवला आहे. पाकिस्तानला अद्याप आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत कीवींविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
कराचीची खेळपट्टी कशी असेल : या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि बाउन्स मिळू शकतो, परंतु कालांतरानं खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होईल, ज्यामुळं त्यांना मुक्तपणे फटके खेळता येतील. चेंडू जुना झाल्यावर फिरकीपटूंना थोडी पकड मिळू शकते पण जास्त वळण मिळण्याची शक्यता कमी असते. उन्हाळ्यामुळं, 35 व्या षटकानंतर रिव्हर्स स्विंग दिसून येईल, जे वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो, कारण प्रकाशात फलंदाजी करणं सोपं असू शकतं.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?