शारजाह NZW vs SLW Live Streaming :न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील 15वा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आज 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी दुपारी खेळला जाईल.
न्यूझीलंडसाठी अटीतटीचा सामना : सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझिलंड महिला संघ बाद फेरीसाठी पात्र होण्यासाठी या सामन्यात विजयाच्या शोधात असेल. मोसमातील सलामीच्या सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर त्यांना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, श्रीलंकेला त्यांच्या निराशाजनक विश्वचषक मोहिमेचा शेवट विजयासह करायचा आहे. आशिया चषक विजेत्यांनी त्यांचे आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत, ज्यामुळं स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे.
दोन्ही संघांचं हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंकेविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्डवर न्यूझीलंडचं वर्चस्व आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 13 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं 12 वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं केवळ एकच सामना जिंकला आहे. या 13 सामन्यांपैकी पाच T20 विश्वचषक स्पर्धेत झाले, ज्यात न्यूझीलंडनं सर्व सामने जिंकले आहेत.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना शनिवार, 12 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?