महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पहिला सामना पावसात गेल्यानंतर मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार कीवी-कांगारु; 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - NZW VS AUSW 2ND ODI LIVE

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना पावसात वाहून गेला.

NZW vs AUSW 2nd ODI Live
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (WHITE FERNS Social media)

By ETV Bharat Sports Team

Published : 9 hours ago

वेलिंग्टन NZW vs AUSW 2nd ODI Live Streaming : न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 21 डिसेंबर (शनिवार) रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता खेळवला जाईल.

पहिला सामना पावसात : वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये खेळला गेलेला पहिला वनडे सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला. यानंतर आता दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ मैदानात उतरुन अपेक्षित निकाल साधण्याचा प्रयत्न करतील. भारताकडून मालिका पराभवानंतर यजमान संघ पुनरागमन करत आहे आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियन संघानं 11 पैकी 10 वनडे सामने जिंकले आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक विभागात ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून येत आहे. फोबी लिचफिल्ड आणि जॉर्जिया वॉल ही युवा सलामी जोडी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. याशिवाय एलिस पेरी, बेथ मुनी आणि ऍशले गार्डनर हे मधल्या फळीत संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. एलिस पेरीचा न्यूझीलंडविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. गोलंदाजीत मेगन शुट आणि एलाना किंग ही जोडी न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर मोठं आव्हान असेल.

यजमानांसाठी आव्हानात्मक काळ : दुसरीकडे, सध्याचा काळ न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक आहे. नुकत्याच झालेल्या पाच वनडे सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघानं केवळ एक विजय नोंदवला आहे. कर्णधार सोफी डिव्हाईनकडे फलंदाजी आणि गोलंदाजीची जबाबदारी असेल. सुझी बेट्स आणि लॉरेन डाऊन यांच्याकडून संघाला दमदार सुरुवातीची आशा असेल. मधल्या फळीत ब्रुक हॅलिडेनं यावर्षी 8 सामन्यात 284 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत लेग ताहुहू आणि अमेलिया केर या जोडीमध्ये विरोधी संघाला कडवी टक्कर देण्याची क्षमता आहे.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 134 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी एकमेकांविरुद्ध खेळलेल्या 134 वनडे सामन्यांपैकी 100 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडच्या महिलांनी केवळ 31 विजय नोंदवले आहेत तर 3 सामने निकालाशिवाय संपले आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे कधी आणि कुठं खेळवला जाईल?

न्यूझीलंड संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील दुसरा वनडे सामना 21 डिसेंबर (शनिवार) रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता खेळवला जाईल. त्याची नाणेफेक तीन वाजता होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहावा?

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला वनडे मालिका 2024 भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लीव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

न्यूझीलंड : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, लॉरेन डाउन, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, बेला जेम्स, जेस केर, अमेलिया केर, हॅना रोवे, ले ताहुहू, फ्रॅन जोनास.

ऑस्ट्रेलिया : ॲलिसा हिली (कर्णधार), ताहिला मॅकग्रा, ॲशले गार्डनर, ॲनाबेल सदरलँड, मेगन शट, एलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, एलिस पेरी, जॉर्जिया वोल, किम गर्थ.

हेही वाचा :

  1. आगामी कसोटीसाठी 7 'अनकॅप्ड' खेळाडूंचा संघात समावेश; असा कसा निवडला संघ?
  2. पहिल्याच चेंडूवर षटकार, सर्वात वेगवान अर्धशतक; भारतीय युवा फलंदाजानं केला विश्वविक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details