फ्लोरिडा (यूएसए) Lionel Messi hat-trick in 11 Minutes : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या 11 मिनिटांच्या कालावधीत शानदार हॅटट्रिकमुळं त्याच्या संघ इंटर मियामीनं मेजर लीग सॉकर (MLS) सामन्यात न्यू इंग्लंड रिवोल्यूशनवर विजय मिळवला. संघानं हा सामना 6-2 नं जिंकला आणि इंटर मियामीनं नवीन MLS सिंगल-सीझन पॉईंट रेकॉर्ड केला.
मेस्सीनं केली 11 मिनिटांत हॅटट्रिक :मेस्सीनं सामन्याच्या 58व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून सामन्यात प्रवेश केला आणि लगेचच खेळावर प्रभाव पाडला. पहिल्या 39 मिनिटांनंतर, मियामी 0-2 नं पिछाडीवर होता, परंतु त्यानंतर खेळाचा मार्ग बदलला. 58व्या मिनिटाला मेस्सीनं प्रथम बेंजामिन क्रेमस्कीच्या गोलला मदत केली. त्यानंतर 37 वर्षीय खेळाडूनं सलग तीन गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह, मियामीनं (22-4-8, 74 गुण) 2021 मध्ये न्यू इंग्लंड रिवोल्यूशननं मिळवलेल्या 73 गुणांच्या मागील उच्चांकाला मागं टाकलं. या विजयाचा अर्थ हेरन्सनं सपोर्टर्स शील्ड देखील जिंकलं आणि आता MLS कप जिंकण्याचं त्यांचं लक्ष्य असेल.