महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुसल 'सेंच्युरियन' परेरा... 'ब्लॅक कॅप्स'विरुद्ध झळकावलं नव्या वर्षातील पहिलचं शतक - FIRST CENTURION OF 2025

कुसल परेरानं न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानं हे शतक इतक्या वेगानं झळकावलं की 14 वर्षे जुना रेकॉर्डही मोडला.

First Centurion of 2025
कुसल परेरा (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 2, 2025, 9:27 AM IST

नेल्सन First Centurion of 2025 : नवीन वर्षातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेच्या कुसल परेरानं धमाकेदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात त्यानं झंझावाती शतक झळकावलं आहे. परेराचं हे शतक श्रीलंकेच्या फलंदाजानं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये झळकावलेलं सर्वात जलद शतक आहे. त्यानं फक्त 44 चेंडूत त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय शतकाची स्क्रिप्ट लिहिली. 219.56 च्या स्ट्राईक रेटनं खेळलेल्या कुसल परेराच्या शतकी खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे कुसल परेराच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलंच शतक आहे.

कुसल परेरानं मोडला 14 वर्षे जुना विक्रम : कुसल परेरानं आपल्या वेगवान, धारदार आणि स्फोटक शतकाच्या जोरावर 14 वर्षांचा श्रीलंकेचा विक्रमही मोडला आहे. खरं तर, 44 चेंडूत T20 शतक झळकावून तो या बाबतीत जगातील नंबर वन बनला नसावा. तरी त्यानं तिलकरत्ने दिलशानचा सर्वात वेगवान T20 आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडला आहे. दिलशाननं 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 55 चेंडूत शतक झळकावलं होतं.

2025 चा पहिला शतकवीर : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना हा वर्ष 2025 मधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि, नवीन वर्षात क्रिकेटची सुरुवात नेमकी कशा पद्धतीनं व्हायला हवी, याची साक्ष मिळाली आहे. या सामन्यात झंझावाती शतक पाहायला मिळालं आणि धावांचा पाऊसही पडला. कुसल परेरा 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

श्रीलंकेची मोठी धावसंख्या :तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेची सुरुवात काही खास नव्हती पण कुसल परेराच्या शतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. त्याच्यासह सलामीवीर पथुम निसांकाने 12 चेंडूत 14 धावा, कुसल मेंडिसनं 16 चेंडूत 22 धावा केल्या. तर अविष्का फर्नांडोने 12 चेंडूत 17 धावा केल्या. परिणामी श्रीलंकेनं 20 षटकांत 218 धावा उभारल्या. गोलंदाजीत न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, जेकब डफी, झॅकरी फॉल्केस, मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत यजमान कीवी संघानं मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे.

हेही वाचा :

  1. एका बॉलवर फलंदाज दोनवेळा आउट; T20 सामन्यात घडली विचित्र घटना, पाहा व्हिडिओ
  2. विनोद कांबळीला डिस्चार्ज, हॉस्पिटलमध्येच टीम इंडियाची जर्सी घालून केली फलंदाजी; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details