महाराष्ट्र

maharashtra

किशनची 'शान'दार फलंदाजी, दोन षटकार मारत संघाला दिला विजय मिळवून, पाहा व्हिडिओ - jharkhand win

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 18, 2024, 3:08 PM IST

Ishan Kishan : भारतीय संघाचा स्टार खेळाडू इशान किशन सध्या बुची बाबू स्पर्धेत झारखंडचा कर्णधार आहे. सामन्यादरम्यान त्यानं दमदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. किशननं दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली.

Ishan Kishan
इशान किशन (ANI Photo)

हैदराबाद Ishan Kishan : अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन भारतीय क्रिकेट संघापासून बऱ्याच काळापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ईशाननं ब्रेक घेतला होता. तेव्हापासून तो संघात दिसला नाही. तो शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. पण आता ईशाननं भारतीय डोमेस्टिक टूर्नामेंट बुची बाबूमध्ये भाग घेतला आणि त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. या स्पर्धेसाठी इशान किशनची झारखंडचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इशान किशननं आपल्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावलं. यानंतर दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना त्यानं 2 षटकार मारत सामना जिंकला.

इशाननं 2 षटकार मारुन जिंकला सामना : झारखंड आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात झारखंडला विजयासाठी 12 धावांची गरज होती. पण त्यांच्या हातात फक्त 2 विकेट्स होत्या. अशा स्थितीत इशान किशन फलंदाजी करत होता. आकाश राजावत झारखंडच्या डावातील 55 वं षटक टाकत होता. त्याच षटकात स्ट्राइकवर असलेल्या इशान किशननं 2 षटकार मारुन सामना संपवला. त्यामुळं झारखंडनं सामना 2 गडी राखून जिंकण्यात यश मिळवलं.

किशनची पहिल्या डावात दमदार फलंदाजी : सामन्याच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननं तुफानी शैलीत फलंदाजी करत दमदार शतक झळकावलं आणि 106 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना 107 चेंडूंचा सामना करत 114 धावा केल्या. या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 10 षटकार मारले.

सामन्यात काय झालं : बुची बाबू स्पर्धेच्या या सामन्यात मध्य प्रदेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत मध्य प्रदेशनं पहिल्या डावात 225 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात इशान किशनच्या शतकाच्या बळावर झारखंडनं 289 धावा केल्या आणि 64 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मध्य प्रदेश 238 धावा करत सर्वबाद झाला आणि झारखंडला 175 धावांचं लक्ष्य दिलं. झारखंडनं हे लक्ष्य 54.4 षटकांत 2 गडी राखून पूर्ण केलं. इशाननं दुसऱ्या डावातही नाबाद 41 धावा करत आपल्या संघाला विजयाकडे नेलं.

हेही वाचा :

  1. 13 तास फलंदाजी करत खेळली 141 षटकं; क्रिकेटच्या 'या' दिग्गजासमोर गोलंदाजांनी केलं होतं 'त्राहिमाम', 'डॉन'लाही करावी लागली 'बॉलिंग' - WI vs SA Test
  2. भारतीय क्रिकेटमध्ये 16 वर्षांपूर्वी झालं होतं 'विराट' पदार्पण; 'क्रिकेटच्या देवा'चा विक्रम मोडला पण कधीही जिंकलं नाही 'आयपीएल' - 16 years of international cricket

ABOUT THE AUTHOR

...view details