महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अफगाणिस्तानविरुद्ध मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका आयर्लंडसोबत दोन हात करणार; पहिला T20 'इथं' दिसेल लाईव्ह - IRE VS SA 1st T20I LIVE IN INDIA - IRE VS SA 1ST T20I LIVE IN INDIA

Ireland vs South Africa 1st T20I Live Streaming : आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची T20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. T20 मालिकेला आज म्हणजेच 27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

Ireland vs South Africa 1st T20I Live
Ireland vs South Africa 1st T20I Live (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 27, 2024, 1:18 PM IST

अबूधाबी (युएई) IRE vs SA 1st T20I Live Streaming : आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात T20 आणि वनडे मालिका होणार आहे. या दोन्ही मालिका यूएईमध्ये खेळल्या जाणार आहेत. शुक्रवार, 27 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. T20 मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळवली जाणार आहे. झायेद क्रिकेट स्टेडियमच या मालिकेचं आयोजन करेल.

हेड-टू-डेड रेकॉर्ड कसा : आयर्लंडनं डझनभराहून अधिक व्हाईट-बॉल सामन्यांमध्ये केवळ एकदाच दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. जुलै 2021 मध्ये मालाहाइड इथं एकदिवसीय सामन्यात 43 धावांनी आयरिश संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. या सामन्यात त्या कामगिरीती पुनरावृत्ती करण्यास आयर्लंडचा प्रयत्न असेल तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्ध झालेला पराभव विसरुन या मालिकेत शानदार खेळ करत मालिका जिंकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.

दक्षिण आफ्रिकेसमोर खडतर आव्हान : दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका सोपी नसेल. अलीकडेच त्यांना यूएईमध्ये अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जिथं अफगाणिस्ताननं त्यांना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. अशा स्थितीत यूएईमध्ये आयर्लंडचं आव्हान त्यांच्यासाठी सोपं नसेल. आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी संघ खेळताना दिसेल. अशा परिस्थितीत हा सामना सुरू होण्यापूर्वी या मालिकेशी संबंधित सर्व माहितीवर एक नजर टाकूया.

आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका पूर्ण वेळापत्रक :

  • पहिला T20 - 27 सप्टेंबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
  • दुसरा T20 - 29 सप्टेंबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
  • पहिला एकदिवसीय - 2 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी)
  • दुसरी वनडे - 4 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
  • तिसरी एकदिवसीय - 7 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
  • आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कुठं खेळवला जाईल?

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथं होणार आहे.

  • आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना किती वाजता सुरु होईल?

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल.

  • आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.

  • आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

आयर्लंड संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, मॅथ्यू हम्फ्रीज, ग्रॅहम ह्यूम, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, मॅथ्यू ब्रेत्झके, नांद्रे बर्गर, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलेन, सेंट ट्रायसन, एस. लिझाड विल्यम्स

हेही वाचा :

  1. कानपूर कसोटीत शुन्यावर आऊट झाल्यावरही विराट कोहलीला मिळणार लाखो रुपये, अश्विनचीही होणार 'चांदी' - Ind vs Ban 2nd Test

ABOUT THE AUTHOR

...view details