जेद्दाह (सौदी अरेबिया) IPL 2025 Live Streaming : IPL 2025 मेगा लिलाव. या दिवसाची क्रिकेट जगत सर्वात जास्त वाट पाहत आहे. जेव्हा IPL खेळलं जातं, तेव्हा सतत सामने होतात, परंतु समजूतदार संघ मालक या दिवशी अर्धे आयपीएल जिंकतात. हा तो दिवस आहे जेव्हा जगभरातील मोठे क्रिकेटपटू जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगसाठी बोली लावतात. चाहत्यांसोबतच क्रिकेटपटूही त्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. यावेळी BCCI नं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह इथं मेगा लिलाव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जर तुम्हालाही आयपीएलचा लिलाव लाइव्ह पाहायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्यासाठी सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.
IPL लिलावासाठी संघांनी आपापली रणनीती बनवली : इंडियन प्रीमियर लीगनं आता वेग पकडला आहे. सर्व संघ आता 24 आणि नंतर 25 तारखेची वाट पाहत आहेत. या खेळाडूला कोणत्याही किंमतीत आपल्या संघात ठेवणार असल्याची विशलिस्ट संघांनी तयार केल्याचं वृत्त आहे. याशिवाय पहिल्या पसंतीचे खेळाडू उपलब्ध नसले तरी दुसरा पर्याय म्हणून कोणावर बाजी मारायची, अशी रणनीतीही संघांनी आखली आहे. सर्व खेळाडूंच्या कामगिरीची आकडेवारी संघांकडे आली असून, त्याआधारे संघांनी त्यांच्या याद्या तयार केल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर मेगा लिलाव : विशेष म्हणजे मेगा ऑक्शनच्या दिवशी आज आणि उद्या सकाळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. मात्र, लिलाव सुरु होईपर्यंत दिवसाचा खेळ आटोपला जाईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरुन दोन्ही दिवशी दुपारी तीनच्या सुमारास मेगा लिलाव सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. जे रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहू शकतं. पहिल्या दिवसाचे पहिले दोन तास खूप मनोरंजक असतील, कारण या दरम्यान मार्की खेळाडूंची नावं पुकारली जातील. येथील संघांमध्ये बक्षीसयुद्ध होण्याची शक्यता आहे. ज्या संघाच्या पर्समध्ये जास्त पैसे असतील तो जिंकेल.
लिलाव कुठं दिसेल लाईव्ह : आता जर आपण IPL मेगा लिलावाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगबद्दल बोललो, तर तुम्ही ते दोन ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला टीव्हीवर लिलाव लाइव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही त्यासाठी स्टार स्पोर्ट्सवर जाऊ शकता. मेगा लिलाव थेट मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा ॲपवर जावं लागेल. लक्षात ठेवा तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असल्यास, तुम्ही जिओ सिनेमाच्या ॲपमध्ये संपूर्ण लिलाव टीव्हीवर थेट पाहू शकता.
हेही वाचा :
- 6,6,4,6,6,6...युवा फलंदाजाचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 34 धावा काढत ठोकलं वादळी अर्धशतक; पाहा व्हिडिओ
- नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा 10 पटीनं महागडं आहे पर्थचं ऑप्टस स्टेडियम, किती आहे किंमत?
- कधी सुरु होणार IPL 2025? बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा