मुंबई IPL Mega Auction Update : यावर्षी इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये एक मेगा लिलाव होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. आयपीएल 2025 मध्ये, प्रत्येक संघ जवळजवळ पूर्णपणे बदललेला दिसेल. अशा स्थितीत या बहुप्रतिक्षित लिलावाची प्रतीक्षा नोव्हेंबरमध्ये संपेल, अशी अपेक्षा आहे. धोनीसह अनेक बड्या खेळाडूंना संघ त्यांना कायम ठेवणार की सोडणार याची चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत.
नोव्हेंबरमध्ये लिलाव होण्याची शक्यता : क्रिकबझच्या एका अहवालानुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 18 व्या हंगामासाठी बहुप्रतिक्षित लिलाव नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा लिलाव आयोजित केला जाऊ शकतो. अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझींना या शक्यतेचे संकेत दिले आहेत आणि लिलाव जवळजवळ निश्चितपणे परदेशात होईल असंही म्हटलं आहे.
परदेशी भूमीवर लिलाव होण्याची शक्यता : गेल्या वेळी देखील डिसेंबरमध्ये दुबईत आयपीएल 2024 चा मिनी लिलाव झाला होता. अशा स्थितीत यावेळीही हा कार्यक्रम परदेशी भूमीत, विशेषत: मध्यपूर्वेत आयोजित केला जाण्याची आशा आहे. बीसीसीआयनं यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. तथापि, मेगा लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझींना कायम ठेवण्याचे नियम अद्याप कळालेले नाहीत. त्यामुळं काही फ्रँचायझी अधिकाऱ्यांना लिलावाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल की नाही, अशी भीती वाटत आहे. जरी या महिन्याच्या अखेरीस रिटेन्शन नियम जाहीर झाले तरी सर्व फ्रँचायझींना सुमारे 2 महिन्यांचा वेळ मिळेल.
अनेक संघाकडून नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती : फ्रँचायझी सध्या आपल्या खेळाडूंना कायम ठेवण्याच्या आणि सोडण्याच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, यासोबतच प्रशिक्षकांच्या करारावरही स्वाक्षरी होत आहे. पंजाब किंग्जनं अलीकडेच रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे, तर राजस्थान रॉयल्सनंही राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
हेही वाचा :
- WATCH: 21 वर्षीय फलंदाजानं मारला 124 मीटर लांब षटकार, तरीही इतिहास रचण्यास हुकला - 124 Meter Six
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना भारतात 'इथं' दिसणार लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 1st ODI Live in India