महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

42 वर्षीय धोनीचं अनोखं 'त्रिशतक'; टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू - MS Dhoni Record

MS Dhoni Record : एम. एस. धोनीनं रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून मोठा विक्रम केला. यष्टीरक्षक म्हणून त्यानं 300 खेळाडुंना बाद करण्याचा विक्रम केलाय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 7:23 AM IST

Updated : Apr 1, 2024, 8:19 AM IST

विशाखापट्टणम MS Dhoni Record : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीनं एक मोठा विक्रम केलाय. या सामन्यात त्यानं एक झेल घेत यष्टीरक्षक म्हणून 300 खेळाडुंना बाद करण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो टी-20 (आंतरराष्ट्रीय आणि डोमॅस्टिक) क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरलाय.

दिग्गजांना टाकलं मागे : एमएस धोनीनं रविवारी विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली. धोनीनं पृथ्वी शॉला बाद करण्यासाठी विकेटच्या मागं एक सोपा झेल घेतला. धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये 300 बाद (झेल + स्टंप) करणारा पहिलाच यष्टीरक्षक बनलाय. चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज खेळाडूनं दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही कामगिरी केलीय.

आणखी एका विक्रमाच्या जवळ : धोनीनं या मोसमात तीन डावात चार झेल आधीच घेतले आहेत. यासह टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या क्विंटन डी कॉकच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकनं टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 220 झेल घेतले आहेत. तर धोनीच्या नावावर 213 झेल आहेत. धोनीला त्याला मागं टाकण्यासाठी फक्त 7 झेल कमी आहेत. या आयपीएलमध्ये तो त्याला मागे टाकू शकतो. धोनीनं या मोसमात गुजरातविरुद्ध एक झेल घेतला. या झेलचीदेखील क्रिकेटप्रेमींनी खूप कौतुक केले.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करणारे यष्टीरक्षक :

  • एमएस धोनी (भारत) - 300 बाद (213 झेल)
  • दिनेश कार्तिक (भारत) - 274 बाद (207 झेल)
  • कामरान अकमल (पाकिस्तान) - 274 बाद (172 झेल)
  • क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) - 270 बाद (220 झेल)
  • जॉस बटलर (इंग्लंड) - 209 बाद (167 झेल)

हेही वाचा :

  1. 'माही'च्या झंजावती फलदांजीनंतर चेन्नईचा पराभव! शिष्याच्या संघानं रोखला 'गुरु'च्या संघाचा विजयरथ - DC vs CSK
  2. पंजाबच्या 'किंग्स' विरुद्ध लखनौ ठरली 'सुपर जायंट्स'; पंजाबनं गमावला हाताशी आलेला विजय - LSG vs PBKS
Last Updated : Apr 1, 2024, 8:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details