महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महाराष्ट्रातील दिग्गज क्रिकेटपटूसह 'या' दिग्गजांनी गाजवलं राजकारणाचं 'मैदान', एक तर झाला क्रीडामंत्री - Cricketers in Politics

Indian cricketers who have entered politics : भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी राजकीय खेळपट्टीवरही आपलं नशीब आजमावलं आहे. यात काहींना यश मिळालं तर काहींना निराशाही मिळाली. आज आम्ही तुम्हाला अशाच क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत.

Indian cricketers in Politics
भारतीय संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 6, 2024, 7:40 PM IST

Updated : Sep 7, 2024, 6:24 AM IST

नवी दिल्ली Indian cricketers in Politics : क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंचा गौरव आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो. पण वेळोवेळी अनेक क्रिकेटपटूंनी राजकीय क्षेत्रातही आपलं नाव गाजवलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी क्रिकेटसोबतच राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे.

  • गौतम गंभीर :भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी क्रिकेटचं मैदान सोडून राजकारणात प्रवेश करत भाजपाच्या (भारतीय जनता पार्टी) तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली आणि खासदार झाले. आता ते भारतीय संघासोबत आहेत.
गौतम गंभीर (IANS Photo)
  • हरभजन सिंग : भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर आणि टर्मिनेटर म्हणून प्रसिद्ध असलेला हरभजन सिंग राजकीय खेळपट्टीवरही यशाचे झेंडे फडकावत आहे. हरभजन 2022 मध्ये आम आदमी पक्षाकडून राज्यसभेचा खासदार झाला. तेव्हापासून तो आजतागायत राजकारणात आहेत.
हरभजन सिंग (IANS Photo)
  • नवज्योत सिंग सिद्धू : माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही राजकीय खेळपट्टीवर आपली छाप सोडली. ते भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात होते. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी अमृतसरमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती.
नवज्योत सिंग सिद्धू (IANS Photo)
  • मोहम्मद कैफ :भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक मोहम्मद कैफनंही राजकारणात नशीब आजमावलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या क्रिकेटपटूनं काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावलं होतं. त्यांनी उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना पराभव पत्करावा लागला.
    मोहम्मद कैफ (IANS Photo)
  • एस श्रीशांत : माजी भारतीय क्रिकेटपटू तसंच 2007 आणि 2011 च्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य, एस श्रीशांतनंही राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. आयपीएलमधील फिक्सिंगच्या आरोपांमुळं त्याची कारकीर्द ठप्प झाली होती. यानंतर 2016 मध्ये त्यानं केरळमध्ये भाजपाच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवली, पण त्याला विजय मिळवता आला नाही.
एस श्रीशांत (IANS Photo)
  • मोहम्मद अझरुद्दीन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि फिक्सिंगमुळं बंदी घालण्यात आलेला मोहम्मद अझरुद्दीन राजकीय मैदानावरही दिसला आहे. 2009 मध्ये त्यांनी मुरादाबादमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
मोहम्मद अझरुद्दीन (IANS Photo)
  • चेतन शर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा देखील राजकीय खेळपट्टीवर दिसला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या जागेवरुन फरिदाबादची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. ते भारतीय जनता पक्षातही दिसले आहेत.
चेतन शर्मा (IANS Photo)
  • मनोज तिवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मनोज तिवारीनं राजकारणात नशीब आजमावलं आहे. 2021 मध्ये त्यानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवली होती. तृणमूल काँग्रेसनं त्याला शिबपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मनोज जिंकला आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्रीपदावर आहे.
मनोज तिवारी (IANS Photo)
  • विनोद कांबळी :भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचा मित्र विनोद कांबळीही राजकारणाच्या क्षेत्रात उतरला आहे. 2009 मध्ये त्यांनी लोकभारती पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
    विनोद कांबळी (IANS Photo)
  • कीर्ती आझाद :माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य, कीर्ती आझाद यांनी राजकारणातही आपलं नाव कमावलं आहे. त्यांचे वडील, बिहारचे माजी मुख्यमंत्री, भागवत झा आझाद यांच्याप्रमाणे, कीर्ती यांनीही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दरभंगा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तीनदा खासदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आता ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहेत.
कीर्ती आझाद (IANS Photo)
Last Updated : Sep 7, 2024, 6:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details