नवी दिल्ली India Recycled PET Flag : यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी मेन्स T20 World Cup 2024 च्या अंतिम सामन्यात भारतानं विजय मिळवला. या सामन्यात शीतपेय बनवणाऱ्या कोका-कोला इंडिया आणि आयसीसीनं क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमातून मेड इन इंडिया राष्ट्रीय ध्वज आणि क्रिकेट फॉर गुड ध्वज बनवले. विशेष म्हणजे ग्राहकांनी वापरलेल्या पेट बॉटल्स रिसायकल करुन हे ध्वज बनवण्यात आले. कचरा आणि प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करुन तयार करण्यात आलेल्या या पेट बॉटल्सना पॉलिस्टर फॅब्रिक आणि रिसायकल धाग्यामध्ये बदलण्यात आलं. स्टेडियम्समध्ये राष्ट्रगीत समारोहादरम्यान अभिमानानं हे ध्वज प्रदर्शित करण्यात आले.
प्रथम 2023 वर्ल्ड कपमध्येही वापरण्यात आले होते ध्वज : प्रथम 2023 मध्ये आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान रिसायकल केलेले पेट राष्ट्रीय ध्वज सादर करण्यात आले. यामुळे कोका कोला ही क्रिकेटमध्ये हे ध्वज सादर करणारी जगातील पहिली शीतपेय कंपनी बनली. मार्की इव्हेंटदरम्यान विविध हरित उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत प्रयत्न केल्यानं या शीतपेय बनवणाऱ्या कंपनीनं सहभागी 20 देशांच्या या राष्ट्रीय ध्वजांना डिझाइन केलं. विशेष म्हणजे असे ध्वज बनवून कंपनीनं पर्यावरणाप्रती जबाबदारी कायम राखली आहे. या ध्वजांची लांबी 35 मीटर आणि रूंदी 20 मीटर असून हे ध्वज जगातील सर्वात मोठे ध्वज असल्याचा दावा कंपनीनं केला. नऊ आयसीसी क्रिकेट फॉर गुड ध्वज देखील डिझाइन केले, अशी माहिती सूत्रांना देण्यात आली.