दुबई INDW vs NZW Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 यांच्यात आज ICC महिला T20 विश्वचषकील चौथा सामना 4 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर सोफी डिव्हाईन न्यूझिलंडचं नेतृत्व करेल. दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
भारताची मदार कोणत्या खेळाडूवर : भारताच्या महिला संघात कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, रेणुका सिंग ठाकूर आणि इतर अनेक प्रमुख खेळाडू आहेत. भारतीय संघ ICC महिला T20 विश्वचषक 2018 च्या अंतिम फेरीत आणि स्पर्धेच्या मागील आवृत्तीच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. भारतीय महिला संघाला हा सामना जिंकून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात करायची आहे.
न्यूझिलंड प्रबळ दावेदार : दुसरीकडे, न्यूझीलंड महिला संघात कर्णधार सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, अमेलिया केर आणि ली ताहुहू यांच्यासह अनेक प्रभावी खेळाडू आहेत. त्या आपल्या क्षमतेनुसार खेळून सामना जिंकेल, अशी आशा असेल. ICC महिला T20 विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी न्यूझिलंड प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, आणि आपल्या खेळीतून हा दावा आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारतीय महिला आणि न्यूझीलंड महिला T20I मध्ये आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात 4 वेळा भारतानं विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडनं नऊ सामने जिंकले आहेत. परिणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला शुक्रवार, 4 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला किती वाजता सुरु होईल?