कानपूर IND vs BAN 2nd Test Live Streaming Free :भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर इथं खेळवला जाईल. भारतीय संघानं पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. भारतीय संघानं बांगलादेशला 515 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 234 धावांत गारद झाला. यासह भारतीय संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाची नजर दुसरी कसोटी जिंकून मालिका काबीज करण्यावर असेल. दुसरीकडे बांगलादेशचा संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. मात्र, भारताला पराभूत करणं बांगलादेशसाठी इतकं सोपं नसेल.
कानपूरच्या मैदानावर फिरकीपटूंना मिळते मदत : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये फिरकीपटूंना नेहमीच मदत मिळत असते. यावेळीही असंच काहीसं अपेक्षित आहे. या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-7 गोलंदाजांमध्ये फक्त 6 फिरकीपटू होते. या सर्वांची सरासरीही मजबूत झाली आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी इथं सर्वाधिक बळी घेतले आहेत.
कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन : यावेळीही ग्रीन पार्कच्या खेळपट्टीच्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, इथं चेंडू संथ असेल आणि तो कमी वळणारा ट्रॅक असेल. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार एकतर 4 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकतो. या फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. अश्विननं पहिल्या कसोटीतही शतक झळकावलं होतं. तसंच संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला विश्रांती देऊन कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. याचं कारण अक्षर आणि जडेजा हे सारखेच फिरकीपटू आहेत. या संयोजनामुळं भारतीय संघ अधिक मजबूत होईल.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कधी होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.
-
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं होणार आहे?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?