चैन्नई IND vs ENG 2ND T20I :भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय T20I सामन्यात भारतानं दोन गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्मानं (72) नाबाद अर्धशतक झळकावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
भारताची पुन्हा घातक गोलंदाजी : या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. यानंतर इंग्लंड संघानं निर्धारित 20 षटकात 165 गावांची मजल मारली. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अर्षदीप सिंगनं पहिल्याच षटकात सलामीवीर फिलिप सॉल्टला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर पुन्हा एकदा कर्णधार जॉस बटलर (45) यांनं इंग्लंडचा डाव सावरला. तर शेवटी ब्रायडन कार्स (31) याच्या आक्रमक खेळीमुळं इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.