धर्मशाळा IND vs ENG 5th Test 2nd Day : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं पहिल्या डावात 120 षटकात 8 गडी गमावून 473 धावा केल्या आहेत. यासह भारताने इंग्लंडवर 255 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं केवळ 218 धावा केल्या होत्या. भारतासाठी, दुसऱ्या दिवसअखेरीस कुलदीप यादव 27 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे आणि जसप्रीत बुमराहनं 19 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं शतकी खेळी केलीय.
रोहित, शुभमनची शतकी खेळी :भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाळा इथं सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी 218 धावांवर सर्वबाद झाला होता. आता भारतीय संघ फलंदाजी करत आहे. आज भारतानं आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मानं शतक झळकावलं. त्याचं कसोटी क्रिकेट मधील हे 12वं शतक ठरलं. तसंच शुभमन गिलनंही कसोटीत आपलं चौथं शतक झळकावलं. मात्र लंच ब्रेकनंतर हो दोन्ही शतकवीर लागोपाठच्या षटकात बाद झाले. त्यांनतर आपला पहिला कसोटी सामना खेळणारा देवदत्त पड्डीकल (44) आणि सरफराज खान (56) यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 97 धावांची केलीय. चहापानापर्यंत भारतीय संघाच्या 3 बाद 376 धावा झाल्या असून भारतीय संघ 158 धावांनी आघाडीवर आहे.
400 धावांचा टप्पा पार : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ या धावसंख्येसह (135/1) खेळण्यास सुरुवात केली होती. आजचा दिवस भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा राहिला आहे. भारतीय संघ आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. धर्मशाळा कसोटीत इंग्लंडला झटपट पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला काही योजना आखाल्या आहेत. यात प्रथम आक्रमक फलंदाजी करुन पहिल्या डावात 400 हून अधिक धावांची मोठी धावसंख्या उभारावी लागेल. यासाठी कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, सरफराज खान, रवींद्र जडेजा आणि देवदत्त पडिक्कल यांना चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघानं पहिल्या डावात 400 हून अधिक धावा केल्या आणि इंग्लंडविरुद्ध 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली तर डावानं विजय मिळवण्याची संधी आहे.
पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंचं वर्चस्व : पहिल्या दिवशी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांत आटोपला. सर्व 10 विकेट स्पिनरनं घेतल्या. कुलदीप यादवनं पाच विकेट घेतल्या, तर अश्विननं चार विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीनं सर्वाधिक 79 धावा केल्या आहेत. जडेजालाही एक विकेट मिळाली.
हेही वाचा :
- धर्मशाळा कसोटीत जैस्वालनं 'यशस्वी' खेळी करत रचला इतिहास; यशस्वी जैस्वाल थेट डॉन ब्रॅडमन सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत
- IND Vs ENG Test Match : धारदार गोलंदाजीनंतर भारताची आक्रमक फलंदाजी; सामन्याच्या पहिल्याचं दिवशी 'पाहुणे' बॅकफुटवर