हैदराबाद IND vs ENG 1st test day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस असून भारतानं पहिल्या दिवसाच्या 119/1 धावांच्या पुढं खेळण्यास सुरुवात केलीय. सध्या भारताकडून के एल राहूल (40) आणि श्रेयस अय्यर (0) खेळत आहेत. पहिल्या सत्रातील ड्रिंक्स ब्रेकपर्यंत भारताच्या 37 षटकांत 173/3 धावा झाल्या आहेत. अद्यापही भारत इंग्लंडपेक्षा 73 धावांनी मागे असून 7 गडी शिल्लक आहेत.
दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकांत भारतला धक्का :आज सकाळी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यानं दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर याच षटकांत इंग्लंडचा पार्ट टाईम फिरकीपटू जो रुटनं त्याला झेलबाद केलं. जैस्वाल (80) च्या रुपानं पहिल्याचं षटकात धक्का बसला. यानंतर राहूल आणि गिल यांनी डाव सावरला. परंतू डावाच्या 35व्या षटकात टॉम हर्टलीनं गिलला 23 धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली.
- पहिल्या दिवसाची स्थिती :इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ 64.3 षटकांत सर्वबाद 246 धावांवर आटोपला. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं 23 षटकांत 1 गडी गमावून 119 धावा केल्या होत्या.