महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कानपूरचं 'ग्रीन पार्क' म्हणजे भारतीय संघाचा 'अभेद्य किल्ला'; 1983 पासून आहे 'अजिंक्य' - IND vs BAN Kanpur Test

IND vs BAN Kanpur Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर भारतीय संघ तब्बल 41 वर्षांपासून अजिंक्य आहे.

IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN Kanpur Test (AFP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 26, 2024, 7:09 PM IST

कानपूर IND vs BAN Kanpur Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरु होणार आहे. यासह ग्रीनपार्क भारतीय संघाच्या 24व्या कसोटी सामन्याचं साक्षीदार होणार आहे. आत्तापर्यंत भारतीय संघानं ग्रीनपार्क स्टेडियमवर एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. तर बांगलादेश हा असा संघ आहे, जो या मैदानावर प्रथमच भारताचा सामना करेल.

भारतीय संघ 41 वर्षांपासून अपराजीत :ग्रीनपार्क स्टेडियमवरील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर इथं 13 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. तर भारतीय संघानं 7 कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावरील शेवटचा कसोटी सामना सुमारे 3 वर्षांपूर्वी 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झाला होता, हा सामना अनिर्णित राहिला होता. सुमारे 41 वर्षांपूर्वी या मैदानावर भारतीय संघानं शेवटचा कसोटी सामना गमावला होता. तेव्हा 21 ऑक्टोबर 1983 रोजी वेस्ट इंडिजनं भारताचा एक डाव आणि 83 धावांनी पराभव केला होता.

ग्रीन पार्कमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेले सामने :

  • 12 जानेवारी 1952 : इंग्लंडनं भारताचा आठ विकेट्सनं पराभव केला.
  • 12 डिसेंबर 1958 : वेस्ट इंडिजनं भारताचा 203 धावांनी पराभव केला.
  • 19 डिसेंबर 1959 : भारतानं ऑस्ट्रेलियाचा 119 धावांनी पराभव केला.
  • 16 डिसेंबर 1960 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 1 डिसेंबर 1961 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 15 फेब्रुवारी 1964 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 15 नोव्हेंबर 1969 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 25 जानेवारी 1973 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 18 नोव्हेंबर 1976 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 02 फेब्रुवारी 1979 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 02 ऑक्टोबर 1979 : भारतानं ऑस्ट्रेलियाचा 153 धावांनी पराभव केला.
  • 25 डिसेंबर 1979 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 30 जानेवारी 1982 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 21 ऑक्टोबर 1983 : वेस्ट इंडिजनं भारताचा एक डाव आणि 83 धावांनी पराभव केला.
  • 31 जानेवारी 1985 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 17 डिसेंबर 1986 : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 08 डिसेंबर 1996 : भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 280 धावांनी पराभव केला.
  • 22 ऑक्टोबर 1999 : भारतानं न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला.
  • 20 नोव्हेंबर 2004 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
  • 11 एप्रिल 2008 : भारतानं दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला.
  • 24 नोव्हेंबर 2009 भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि 144 धावांनी पराभव केला.
  • 22 सप्टेंबर 2016 : भारतानं न्यूझीलंडचा 197 धावांनी पराभव केला.
  • 25 नोव्हेंबर 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा :

  1. बांगलादेश इतिहास रचणार की भारत विजयी मालिका कायम राखणार की? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - IND vs BAN 2nd Test Live Streaming

ABOUT THE AUTHOR

...view details