मुंबई ICC Rankings 2024 : ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत बाबर आझम आता 6 स्थानांनी घसरुन नवव्या स्थानावर आला आहे. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी न खेळताच क्रमवारीत झेप घेतली आहे.
विराट-यशस्वीला न खेळताच फायदा : बाबर आझमच्या क्रमवारीत घसरण होण्याचं कारण रावळपिंडी इथं नुकताच झालेला कसोटी सामना होता. या कसोटी सामन्यात बाबरनं पहिल्या डावात 0 धावा आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या. या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव झाला. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना नुकताच एकही कसोटी सामना न खेळता बंपर नफा मिळाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली आता 2 स्थानांचा फायदा होत तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यशस्वी जैस्वालही एका स्थानाची बढत घेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
जो रुट अव्वल स्थानी कायम : कसोटी क्रिकेटमध्ये जो रुट 881 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्याच्या संघातील साथादीर हॅरी ब्रूकनं 3 स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यासह पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननं सात स्थानांनी झेप घेतली आणि रावळपिंडी कसोटी सामन्यात शतक झळकावून 10व्या स्थानावर पोहोचून कारकिर्दीतील नवीन सर्वोच्च रेटिंग गाठलं. पाकिस्तानचा उपकर्णधार सौद शकीलही त्याच्यापेक्षा मागे नाही, त्यानं बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकामुळं एका स्थानाने झेप घेत 13व्या स्थानावर पोहोचला आहे.